पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/106

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४९] तत्त्वज्ञान ४९. अर्जुनाची विश्वरूपदर्शनाबद्दल उत्कंठा. मग आइका तो किरीटी । घालूनि विश्वरूपी दिठी । पहिली कैसी गोठी । करितां जाहला ॥ है सर्वही सर्वेश्वर । ऐसा प्रतीतिगतं जो पतिकरें। तो बाहेरी होआवा गोचर । लोचनांसी ॥ हे जीवाआंतुली चाड । परि देवांसि सांगता सांकड। कां जे विश्वरूप गूढ । कैसेनि पुसावे॥ म्हणे मागां कवणीं कहीं । जे पढियंतेने पुसिले नाही। ते सहसा कैसे काई । सांगा म्हणों ॥ मी जरी सलगीचा चांग । तरि काय आइसीहूनि अंतरंग। परि तेही हा प्रसंग । बिहाली पुसों॥ माझी आवडेतैसी सेवाजाहली।तरिकाय होईल गरुडाचियायेतुली। परि तोही हे बोली। करीचि ना॥ मी काय सनकादिकांहूनि जवळा।परितयांही नागवेचि हाचाळा। मी आवडेन काय प्रेमळां । गोकुळींचिया ऐसा ॥ तातेही लेकुरपणे झंकविले । एकाचे गर्भवासही साहिले। परि विश्वरूप हे राहविले । न दावीच कवणां ॥ हा ठायवरी गुंज । याचिये अंतरींचे हे निज । केवि उठाउठी मज । पुसो ये पां॥ आणि न पुसोचि जरी म्हणे । तरि विश्वरूप देखिलियाविणे। सुख नोहचि, परि जिणे । तेहीं विपाये ॥ म्हणोनि आतां पुसो अळुमाळसे । मग करूं देवा ठोके तैसें। येणे प्रवर्तला साध्वसे । पार्थ बोलो॥ ज्ञा. ११. २८-३८. १ अनुभवांत असलेला. २ अनुभव, अंगिकार. ३ संकट, संकोच. ४ आवडत्याने. ५ एकदम. ६ नेहाचा. ७ जवळचा. ८ भ्यायली. ९ न करवे. १०. फसविले. ११ गुप्त. १२ झडकर. १३ विचारता येईल. १४ थोडेसें. १५ आवडले तसें. १६ भयाने.