पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/115

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. म्हणोनि आथी नाथी हे बोली । जे देखोनि मुकी जाहली । विचाराची मोडली । वाट जेथे ॥ जैसी भांडघटशरावी । तदाकार असे पृथ्वी।... तैसे सर्व होऊनियां सर्वी । असे जे वस्तु ॥...॥ तयाते याकारणे । विश्वबाहु ऐसे म्हणणे। ...... जे सर्वचि सर्वपणे । सर्वदा करी ॥ आणि समस्तांही ठायां । एके काळी धनंजया। आले असे म्हणोनि जया। विश्वांनि नाम। पैं सवितया आंग डोळे । नाहींत वेगळे वेगळे। तैसें सर्वद्रष्टे सकळे । स्वरूपे जै॥ . . .......... म्हणोनि विश्वतश्चक्षु । हा अचमूच्या ठायीं पक्षु।... बोलावया दक्षु । जाहला वेद ॥ जै सर्वांचे शिरावरी । जे नित्य नादे सर्वापरी । ऐसिये स्थितीवरी । विश्वमूर्धा म्हणिपे ॥ ...... पैं गा मूर्ति तेचि मुख । हुताशना जैसे देख । ऐसे सर्वपणी अशेख । भोक्ते जे ॥ .. यालागी,जया पार्था । विश्वतोमुख हे व्यवस्था। आली वाक्पथा। श्रुतीचिया ॥...॥ वांचूनि हस्त नेत्र पाये । हे भाष तेथ के आहे। सर्वशून्यत्वाचा साहे । निष्कर्ष जे ॥...॥ तैसे साचचि जे एक । तेथ के व्याप्यव्यापक।.. परि बोलावया नावेक । करावे लागे॥ मैं शून्य – दावावे जाहाले । तें बिंदुले एक केले। तैसे अद्वैत सांगावे बोले । तैं द्वैत कीजे ॥ येहवीं तरी पार्था । गुरुशिष्यसत्पथा। आडळ पडे सर्वथा । बोल खुंटे॥ .. ज्ञा. १३. ८६६-८८९. . १ डेरा, घागर, परळ, इत्यादिकांत. २ ज्याचे पाय सर्वत्र आहेत असा. ३ सार. ४ क्षणभर. ५ वर्तुळ. ६ प्रतिबंध.