पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/117

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६६० तो अहोरात्रांचा पैलकंड । कोणे देखावा ज्ञानमार्तड। जो प्रकाश्यवणि सुरवाड । प्रकाशाचा ॥ .. ज्ञा. १६. १-१६. .. ३. नीतिविचार. ६१. इंद्रियांचे बळकटपण. जयांत अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी। जे मनाते सदा मुठीं । धरूनि आहाती ॥ तेही किती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी । जैसी मंत्रज्ञाते विवसी । भुलवी कां॥ देखे विषय हे तैसे । पावती ऋद्धीसिद्धीचेनि मिर्षे । मग आकळिती स्पर्शे । इंद्रियांचेनी ॥ तिये संधी मन जाये । अभ्यासी थोटीवले ठायें । ऐसे बळकटपण आहे । इंद्रियांचें ॥ ज्ञा. २. ३११-३१४. ६२. अमानित्व. तरी कवणेही विषयीचे । जीवा साम्य होणे न रुचे । संभावितपणाचे । वोझे जया ॥ आथिलचि गुण वानितां । मान्यपणे मानितां।। योग्यतेचे येतां । अंगा रूप ॥ १ पलीकडचे तीर. २ सुकाळ, ३ गस्त. ४ कुंपण. ५ केले जातात. ६ बळ. ७ हडळ. ८ निर्बल, कुंठित. ९ राहते. १० बरोबरी, सारखेपणा. ११ असलेले.