पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/133

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. येहवीं इंद्रियांचेनि मेळे । विषयांवरी तरी लोळे। परि विकाराचेनि विटाळे । लिंपिजेना ॥ भेटलेया वाटेवरी । चोखी आणि महारी। तेथ नांतळे तियापरी । राहाटों जाणे ॥ कां पतिपुत्राते आलिंगी । एकचि ते तरुणांगी। तेथ पुत्रभावाच्या आंगीं । न रिगे काम ॥...॥ पाणिये हिरा न भिजे । आधणी हरळ न शिजे ॥ तैसी विकल्पजाते न लिंपिजे । मनोवृत्ती ॥ तया नांव शुचित्वपण । पार्थ गा संपूर्ण । हे देखसी तेथ जाण । ज्ञान असे॥ ज्ञा. १३. ४६२-४८४. ७०. स्थैर्य. . आणि स्थिरता साचे । घर रिगाली जयाचें। तो पुरुष ज्ञानाचे । आयुष्य गा॥ . देह तरि वरिचिलीकडे । आपुलियापरी हिंडे । परि बैसका न मोडे । मानसींची ॥...॥ कां लोभियां दूर जाये । परि जीव ठेविलाचि ठाये । तैसा देह चालतां न होये । चळ चित्ता॥ जातया अभ्रासवे । जैसे आकाश न धांवे। भ्रमणचक्रीं न भवे । ध्रुव जैसा॥. पांथिकांचिया येरझारा-। सर्वे पंथ न चले धनुर्धरा। कांनाहीं जोविं तरुवरां । येणे जाणे ॥ तैसा चळणवळणात्मकीं । असोनि ये पांचभौतिकीं। भूतोर्मी एकी । चळिजेना ॥ TEETT11 १ मनानेही स्पर्शित नाही. २ वरच्या बाजूनें. ३ खेपा.