पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/144

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नीतिविचार. इया ग्रामसिंहांचिया ठायीं । जैसा मिळणी ठावो अठावो नाहीं। तैसा स्त्रीविषयी काहीं। विचारी ना॥ कर्माचा वेळ चुके । कां नित्यनैमित्तिक ठोके। .. ते जया न दुखे । जीवामाजी ॥...॥ पावो सूदलियासवे । जैसे थिल्लर कालवे । तैसा भयाचेनि नांवे । गजबजे जो ॥ मनोरथांचिया धारसा । वाहणे जयाचिया मानसा । पुरी पडिला जैसा । दुधिया पाहीं...। तयाच्या ठायीं उदंड । अज्ञान असे वितंडें । जो चांचल्ये भावंड । मर्कटाचे ॥...॥ वसूं जैसा मोकाट । वारा जैसा अफाट । फुटला जैसा पाट । निरंजनी ॥ आंधळे हातिरूं मातले । कां डोंगरी जैसे पेटले। तैसे विषयीं सुटले । चित्त जयाचे ॥...॥ जो अखंड भोगा जैचे । जया व्यसन कामक्रीडेचे । मुख देखोनि विरक्ताचे । सचैल करी॥ खरी टेको नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडे। तरी जेविं न काढे। माघौता खर ॥ तैसा जो विषयालागीं। उडी घाली जळते आगीं। व्यसनांची आंगीं । लेणी मिरवी ॥ फुटोनि पडे तंव । मृग वाढवी हांव। . परि न म्हणे ते माव। रोहिणीची ॥ तैसा जन्मोनि मृत्युवरी । विषयीं त्रासितां बहुती परी। तही त्रास नेघे धरी । आधिक प्रेमा॥ हिलिये बाळदशे। आई बा हेचि पिसे । ते सरे मग स्त्रीमासे । भुलोनि ठाके ॥ - १ कुत्र्याच्या. २ थांबते. ३ घातल्याबरोबर. ४ डबकें. ५ धारेवर. ६ भोपळा. ७ मोठे. ८ बैल. ९ मोकळा. १० निर्जनवनांत. ११ हत्ती. १२ परिश्रम करतो. १३ सचैलस्नान. १४ गाढवी. १५ लाथेने. १६ भास, कपट. १७ मृगजळाची. १८ वेड.