पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/149

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६७९ ज्ञानेश्वरवचनामृत. उपनिषदांकडे न वचे । योगशास्त्र न रुचे। अध्यात्मज्ञानी जयाचें । मनचि नाहीं॥ आत्मचर्चा एकी आथी । ऐसिये बुद्धीची भिंती। पाडूनि जयाची मति । वोढाळ जाहाली ॥ कर्मकांड तरी जाणे । मुखोद्गत पुराणे। ज्योतिषी तो म्हणे । तैसेचि होय ॥ शिल्पी अतिनिपुण । सूपकर्मीही प्रवीण। विधि आथर्वण । हाती आथो॥ कोकीं नाहीं ठेले । भारत कीर म्हणितले। आगम आपविले । मूर्त होती॥ नीतिजात सुझे । वैद्यकही बुझे । काव्यनाटकी दुजे । चतुर नाहीं ॥ स्मृतींची चर्चा । दंश जाणे गारुडीचा । निघंट प्रक्षेचा । पाइकु करी ॥ पैं व्याकरणी चोखडा । ती अतिगाढा। परि एक आत्मज्ञानी फुडा । जात्यंध जो ॥ ते एक वांचूनि आघवा शास्त्रीं । सिद्धांतनिर्माणधाँत्री। परि जळो ते मूळनक्षत्रीं। न पाहे गा॥ मोराआंगी अशेषे । पिसे असती डोळसे। परि एकली दृष्टी नसे । तैसे ते गा॥ ... तैसे शास्त्रजात जाण । आघवेचि अप्रमाण । पार्थी अध्यात्मशानेविण । एकलेनि ॥...॥ आणि अध्यात्मज्ञान कांहीं । जेणे मानिलोच नाहीं। तो ज्ञानार्थ न देखे काई । हे बोलावे असे ॥ ऐलीचि थडी न पवता । पळे जो माघौता । तया पैलद्वीपींची वाता । काय होय ॥ .. १ पाकशास्त्र. २ कामशास्त्र. ३ आपलेसे केले. ४ समजतो.. ५ मर्मः ६चाकर.७ कर्ता, आधार.