पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/150

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८०] नीतिविचार. मागां श्लोकांचेनि अर्धाधैं । ऐसे सांगितले श्रीमुकुंदें। मा उफरार्टी इये ज्ञानपदे । तेचि अज्ञान ॥ ज्ञा१३. ६५३-८५२. ८०. दैवीसंपत्तीचे वर्णन. आतां तयाची दैवगुणां-। माजि धुरेचा बैसणा। बैसे तया आकर्णा । अभय ऐसे ।।...॥ तैसा कर्माकर्माचिया मोहरा । उठू नेदुनि अहंकारा। संसाराचा दरारा । सांडणे येणे ॥ अथवा ऐक्यभावाचेनि पैसे । दुजे मानूनि आत्मा ऐसे। ... भयवार्ता देशे । दवडणे जे॥ पाणी बुडवू ये मिठातें । तंव मीठचि पाणी आते। तोर्वि आपण जालेनि अद्वैत । नाशे भय ॥...॥ नातरी वोर्षिया नाहीं मांडिली । ग्रीष्में नाहीं सांडिली। माजि निजरूपे निवडिली । गंगा जैसी॥ तैसी संकल्पविकल्पाची वोढी । सांडूनि रजतमाची कावडी। भोगितां निजधर्माची आवडी । बुद्धि उरे॥ इंद्रियवर्गी दाखविलिया। विरुद्धा अथवा भलेया। ... विस्मयो कांहीं केलिया। नुठी चित्तीं ॥ गांवा गेलिया वल्लभ । पतिव्रतेचा विरहक्षोभ । भलतेसणी हानि लाभ । न मनी जेवी ॥ तेवि सत्स्वरूप रुचलेपणे । बुद्धि में ऐसे अनन्य होणे । ते सत्वशुद्धी म्हणे । केशिहंता ॥ आतां आत्मलाभाविखीं । ज्ञानयोगामाजि एकीं। जे आपुलिया ठाकीं। हांवे भरे॥..... १ श्रेष्ठपणाचा, २ ऐका. ३ विस्तारानें. ४ होते. ५ वर्षाऋतू. ६ भलत्या - रीतीनें. ७ केशिदैत्यास मारणारी. ८ ठिकाणी. ९ इच्छा.