पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/194

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१११४] साक्षात्कार. १४१ ११४. दुराचारी सुद्धा साधु होऊ शकतो.. तो आधी जरी दुराचारी । तरि सर्वोत्तमचि अवधारी। जैसा बुडाला महासागरी । न मरत निघाला॥ तयाचे जीवित ऐलथडिये आलें । म्हणोनि बुडालेपण जेविं वायां गेले । तेविं नुरेंचि पाप केले । शेवटलिये भक्ती ॥ यालागी दुष्कृती जरी जाहाला । तरी अनुतापतीर्थी न्हाला । न्हाउनी मजआंत आला । सर्वभावें ॥ तरि आतां पवित्र तयाचे कुळ । आभिजात्य तेचि निर्मळ । जन्मलेयाचे फळ । तयासींच जोडले ॥ तो सकळही पढिन्नला । तपे तोचि तपिन्नला। अष्टांग अभ्यासिला । योग तेणे ॥ है असो बहुत पार्था । तो उतरला कमैं सर्वथा। जयाची अखंड गा आस्था । मजचि लागीं ॥ अवधिया मनोबुद्धीचिया रहाटी । भरोनि एकनिष्ठेची पेटी। मजमाजी किरीटी । निक्षेपिली जेणे॥ तो आतां अंवसरे मजसारिखा होईल। ऐसा हन भाव तुज जाईल। हां गा अमृताआंत राहील । तया मरण कैचे ॥...॥ म्हणोनि तयाचिया चित्ता । माझी जवळीक पडुसुता। तेव्हांचि तो तत्वतां । स्वरूप माझे ॥ जैसा दीपें दीप लाविजे । तेथ आदील कोण हे नोळखिजे। तैसा सर्वस्वे जो मज भजे । तो मीचि होऊनि ठाके ॥ ज्ञा. ९, ४१८-४२८. - . १ अलीकडच्या काठी. २ कुलीनता. ३ तळमळ, आवड. ४ व्यवहार. .. ५ ठेविली, टाकिली. ६ अवकाशानें. ७ पूर्वीचा, पहिला.