पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/203

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६ १२२ यमदमा अवकळा आणिली। तीथै ठायावरूनि उठविलीं। यमलोकींची खुटिली । राहाटी आघवी ॥ यम म्हणे काय यमावे । दम म्हणे कवणाते दमावे। तीर्थे म्हणती काय खावे । दोष औषधासि नाहीं॥ ऐसे माझेनि नामघोष । नाहींचि करिती विश्वाची दुःखे । अवघे जगचि महासुखें । दुमदुमित भरले ॥ से पाहांटेविण पाहावित । अमृतेंविण जीववित । योगेवीण दावित । कैवल्य डोळां ॥ परि राया रंका पांड धरूं । नेणती सानेयां थोरां कडसैणी करूं । एकसरे आनंदाचे आवारूं । होत जगा॥ कहीं एकाधेनि वैकुंठा जावे । तैं तिहीं वैकुंठचि केले आघवें। ऐसे नामघोषगौरवे । धवळले विश्व ॥ तेजें सूर्य तैसे सोज्वळ । परि तोही अस्तवे हे किंडाळ। चंद्र संपूर्ण एकादे वेळ । हे सदा पुरते॥ मेघ उदार परि वोसरे । म्हणउनी उपमेसी न पुरे। हे निशंकपणे सपाखरे । पंचानन ॥ जयांचे वाचे पुढां भोज। अखंड नाम नाचत असे माझे। जे सन्मसहस्त्रीं वोळगिजे। एकवेळ यावया॥ तो मी. वैकुंठी नसे । वेळ एक भानुबिबी ही न दिसे। परी योगियांचीही मानसे । उमरडोनि जाय ॥ परि तयापासी पांडवा । मी हारपला गिवसोवा। जेथ नामघोष बरवा। करिती माझा॥ कैसे माझ्या गुणी धौले । देशकाळाते विसरले।। कीर्तनसुखे सुखावले । आपणपांचि ॥ . कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामांचे निखिल प्रबंध । माजी आत्मचर्चा विशेद । उदंड गाती॥ १ योग्यता. २ निवड. ३ गांवकुस. ४ प्रकाशित केलें, पापरहित केलें. ५ वाईट. ६ सरतो. ७ कृपालु, सकृप. ८ आवडीने. ९ सेवा करावी लागते. १० उलंघून. "हरवलेला. १२ शोधून काढावा. १३ तृप्त झाले. १४ केवळ. १५ शुद्ध. ११]