पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/206

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ ६ .. १५३ ६१२६] साक्षात्कार. जेथ अमृताचेनि पाडे । मुळांही सकट गोडे । जोडती दाट झाडे । सदा फळती ॥ पाउलापाउलां उदकें । वर्षाकाळावीण अतिचोखे। निर्झर कां विशेषे । सुलभ जेथें ॥ हा आतपही अळुमाळ । जाणिजे तरी शीतळ । पवन अति निश्चळ । मंद झुळके ॥ बहुतकरूनि निःशब्द । दाट न रिघे श्वापद । शुक हन षट्पेद । तेउते नाहीं ॥ पाणिलगे हंसे । दोनी चारी सारसे । कवणे एके वेळे बैसें । कोकिळ ही हो कां ॥ निरंतर नाहीं । तरी आली गेली कांहीं। होतु का मयूरे ही। आम्ही ना न म्हणो॥ परि आवश्यक पांडवा । ऐसा ठाव जोडावा। तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ॥ ज्ञा. ६. १६३-१७९. १२६. कुंडलिनीचे उत्थान व अनाहतनादश्रवण. हे असो ते कुंडलिनी बाळी । हृदयात आली। तंव अनाहताची बोली। चावळे ते ॥ शक्तीचिया आंगा लागले । बुद्धीचे चैतन्य होते जाहले । ते तेणे आइकिलें। अळुमाळ || घोषाच्या कुंडी। नादचित्रांची रूपडी। प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसा॥ १ योग्यतेची, सारखी.२ झरे. ३ थोडा. ४ पशु. ५ भ्रमर. ६ तेथे. ७ पाण्याच्या आश्रयाने राहणारे. ८ चक्रवाकपक्षी. ९ गुप्त. १० योधारणेत एक प्रकारचा होणारा शब्द. ११ बोलते. १२ कुंडलिनीच्या. १३ किंचिंत्. १४ एक प्रकारचा नाद. १५ रूपं. १६ ओंकाराच्या. १७ आकाराने.