पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/216

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ६१४०] साक्षात्कार. १६३ जन्ममृत्यूंची भाख । हारपोनि जाय निःशेख । आंत बाहेरी महासुख । वाढोंचि लागे । मग दैवगत्या जरि सेविजे । तरि ते आपणचि होउनी ठाकिजे। ते तुज देतां चित्त माझे । पुरे म्हणों न शके ॥ तंव तुझे नामचि आम्हां आवडे । वरि भेटी होय आणि जवळिक, जोडे । पाठी गोठी सांगसी सुरवाडे । आनंदाचेनि ॥ . ज्ञा. १०. १९२-२००. १४० साक्षात्कारी पुरुषाचें देहाविषयीं औदासीन्य. तरि आतां देह असो अथवा जावो । आम्हीं तो केवळ वस्तूचि आहो। कां जे दोरीसपत्व वावो। दोराचिकडूनि ॥ मज तरंगपण असे की नसे । ऐसे हैं उदकाप्रति कहीं भासे । ते भलतेव्हां जैसे तैसें । उदकचि की॥ तरंगाकार न जन्मेचि । ना तरंगलोपे न निमोचि । तेविं देहीं जे देहेंचि । वस्तु जाहले ॥ आतां शरीरांचे तयांचिया ठायीं । आडनांवही उरले नाहीं। तरि कोणे काळे काई । निमे ते पाहे पां॥ मग मार्गात कासया शोधावे । कोणे कोनि के जावे। जरि देशकाळादि आघवें। आपणाच असे ॥ आणि हां गा घट जे वेळी फुटे । ते वेळी तेथिचे आकाश लागे नीट वाटे । वाटा लागले तरि गगना भेटे । येरवीं काय चुके । ऐसिया बोधाचेनि सुरवाडे । मार्गामार्गाचे सांकडे। तया सोहंसिद्धां न पडे । योगियांसी ॥ या कारणे पडुसुता । तुवां होआवे योगयुक्ता।.. तेतुलेनि सर्वकाळी साम्यता । आपैसया होईल ॥ १. गोष्ट, वार्ता. २ भरानें. ३ खोटें. ४ केव्हाही. ५अथवा. ६ मरत नाही. ७ देहासुद्धां. ८ सुखाने, सोईनें. ......