पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/226

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१४८] साक्षात्कार.. . किंबहुना ऐसी दशा । ते ब्रह्मत्व गा सुदंशा । हे तो पावे जो ऐसा । मातें भजे ॥ पुढतीं इहीं लिंगीं । भक्त जो माझा जगीं। हे ब्रह्मता तयालागीं। पतिव्रता। जैसे गंगेचेनि वोघे । डळमळीत जळ जे निधे। सिंधुपद तया जोगे । आन नाहीं॥ तैसा ज्ञानाचिया दिठी। जो माते सेवी किरीटी। तो होय ब्रह्मतेच्या मुकुटीं। चूडारन ॥ ज्ञा. १४. ३८९-४००, . १४८. अष्टसात्त्विकभाव. तेथ एक विश्व एक आपण । ऐसे अळुमाळु होते जे दुजेपण। तेही आटोनि गेले अंतःकरण । विराले सहसा ॥ आंतु आनंदा चेहरे जाहाले। बाहेरी गात्रांचे बळ हारपोनि गेले आपाद पांगुतले। पुल काँचले ॥ वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैलांचे सर्वांग जैसे। विरूढे कोमलांकुरी तैसें । रोमांच जाहाले । शिवतला चंद्रकरी । सोमकांत द्राव धरी। तैसिया स्वेदैकणिका शरीरी । दाटलिया। माजिसांपडलेनि अलिकुळे । जळावरी कमळकळिकाजविं आंदोळे तेविं आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरी कांपे॥ कपुरकर्दळीची गर्भपुटे । उकलतां कापुराचेनि कोदोर्ट। पुलिकों गळती तेवि थेबुटे । नेत्रौनि पडती ॥ १ मर्मज्ञा. २ शिरोभूषण. ३ थोडेसें. ४ जागृति. ५ इंद्रियांचें. ६ व्याप्त झालें. ७ रोमांचानी. ८ वर्षाऋतूंत. ९ ओहळून गेल्यावर. १० घामाचे बिंदु. ११ भ्रमरसमुदायाने. १२ हालते. १३ कापुरकेळीची. १४ गाभ्याचे पडदे१५ दाट भरणे. १६ कण. १७ नेत्रांतून.