पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/232

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। । ६१५५] साक्षात्कार १५५. भक्तांचे संवादसुख. चित्त मीचि जाहाले । मियेचि प्राणे धाले। मग जीवो मरों विसरले। बोधाचिया भुलीं॥ मग तया बोधाचेनि माजे । नाचती संवादसुखाचेनि भोजे । आतां एकमेकां घेपे दीजे । बोधचि वरी॥ जैसी जवळिकेची सरोवरे । उचंबळलिया कालवती परस्परें। मग तरंगासी धवळारे । तरंगचि होती ॥ तैसी येरयेरांचिये मिळणीं। पडत आनंदकल्लोळांची वेणी । तेथे बोधाची लेणीं । बोधेचि मिरवी । जैसे सूर्ये सूर्यात वोवाळिले । की चंद्र चंद्रम्या खेवे दीधलें। ना तरी सरिसेनि पाडे मिनले । दोन्ही वोघ । तैसे प्रयाग होत सामरैम्याचें । वरी वोसाण तरत सात्त्विकाचे । ते संवादचतुष्पथींचे । गणेश जाहाले ॥ पैं गुरुशिष्यांचिया एकांतीं । जे अक्षरा एकाची वदती। ते मेघाचिया परी त्रिजगतीं । गर्जती सँध ॥ जैसी कमळकळिका जालेपणे । हृदयींचिया मकरदाते राखो नेणे । दे राया रंका पारणे । आमोदींचे ॥ तैसेचि माते विश्वीं कथित । कथितेनि तो कथू विसरत। मग तया विसरामाजि विरत । आंगे जीवे ॥ ज्ञा. १०. ११९-१२८. . १ तृप्त झाले. २ मदाने, ३ संतोषानें. ४ धवलागारें, चुनेगची घरे, ५ आलिंगन. ६ योग्यतेनें. ७ ऐक्यरसाचे. ८ पुरांतील वाहून येणारी लांकडे. ९ संवादरूप चौकांतील ( जेथें चार रस्ते मिळतात तेथें.). १० उच्चार, ११ पुष्कळ. १२ सुवास. .... . .... .