पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/236

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६ १६० ] साक्षात्कार. तेविं मी तयां । जैसे असती तैसियां । कळिकाळ नोकोनियां । घेतला पटीं॥ ... येहवीं तरी माझिया भक्तां । आणि संसाराची चिंता। काय समर्थाची कांता । कोरान्ने मागे ॥ ज्ञा. १२. ७६-८५. . . a १६०." आणि काळाची दृष्टि न पडे । हे आम्हां करणे." ऐसे प्रेमाचेनि बहुवसपणे । नाहीं रातीदिवो जाणणे । केले माझे सुख अव्यंगवाणे । आपणपेयां जिहीं॥ कांजे ते जिया वाटा । निगाले गा सुभटा। ते सोयें पाहोनि अव्हांटी। स्वीपर्वगै ॥...॥ आतां यावरी येतुले घडे । जे तेचि सुख आगळे वाढे। आणि काळाची दृष्टि न पडे । हे आम्हां करणें ॥ लळेयाचिया बाळका किरीटी । गवसणी करूनि स्नेहाचिया दिठी। जैसी खेळतां पाठोपाठीं। माउली धांवे ॥ ते जो जो खेळ दावी । तो तो पुढे सोनयाचा करूनि ठेवी । तैसी उपास्तीची पदवी । पोषित मी जायें॥ जिये पदवीचेनि पोषके । ते माते पावती यथासुखे । हे पाळती मज विशेखे । आवडे करूं ॥ पैं गा भक्तांसि माझे कोडे । मज तयांचे अनन्यगतीची चाड । कांजे प्रेमळांचे सांकड़ । आमुचिया घरीं ॥ पाहे पां स्वर्गमोक्ष उपायिले। दोन्ही मार्ग तयांचिया वाहणी केले। आम्ही आंगही शेखीं वैचिले । लश्मियेसीं ॥ १ जिंकून, पराभवकरून. २ पदरांत. ३ कोरडी भिक्षा. ४ आधिक्याने. ५ पूर्ण. ६ आपलेसें. ७ मार्ग. ८ आडमार्ग. ९ स्वर्ग व मोक्ष. १० अधिक ११ आवडत्या. १२ पांघरूण. १३ उपासनेची. १४ योग्यता, अधिकार. १५. रक्षण,क्षेम.१६ आवड.१७ उप्तन्न झालेले. १८ मार्ग, रहदारी. १९ शेवटी.