पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/24

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- RAICH Raharma T . प्रस्तावना. कोणी चालूच नये असा त्याचा अर्थ होत नाही, म्हणून व्यासांच्या पाठोपाठ भाष्यकारांस वाट पुसून मी अपात्र असलो तरी ही ग्रंथरचना करीन. आधीच चित्तयुक्त, आणि त्यांतच श्रीगुरुकृपा जर जोडेल, तर माझे श्वासोच्छ्रवासही नवे नवे ग्रंथ बनतील असें ज्ञानेश्वर म्हणतात (क्र. १३). ८ ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान गीतेतील तत्त्वज्ञानाच्या पायावर उभारले आहे, हे सांगण्याची जरूरी नाही. यामुळेच गीतेमध्ये तत्त्वज्ञानाचे जे जे विषय येतात ते ते सर्व ज्ञानेश्वरीत आले आहेत. अशाचपैकी मुख्य म्हटला म्हणजे प्ररुति व पुरुष यांचा संबंध हा होय.. ज्ञानेश्वरांची दृष्टांत, उपमा, बगर देऊन कोणताही कठीण विषय अतिभय हृदयंगम करण्याची शैली फार प्रसिद्धच आहे. प्रकृति व पुरुष यांचा जागजागी ज्ञानेश्वरांनी विचार केला आहे. पुरुष काही करीत नाही, व प्रकृति सर्व करित्ये हे दाखवितांना पुरुषास लोहचुंबकाची व प्रकृतीस लोहाची ज्ञानेश्वरांनी उपमा दिली आहे. ज्याप्रमाणे लोहचुंबक चलनवलन न करितां लोहास भ्रमवितो, त्याप्रमाणे पुरुषही चलनवलन न करितां प्रकृतीस चेष्टवितो (क. १४). नखापासून केसापर्यंत प्रकृति शरीरांत जागृत असून मनबुद्ध्यादिकांस टवटवी इच्याचमुळे प्राप्त होते (क्र. १५). तथापि प्रकृति व पुरुष या दोघांसही आपण अनादिसिद्धच समजले पाहिजे. या प्रकृतिपुरुषांचा संयोग वर्णन करण्यास दुरापास्त आहे. येथे बायको मिळविते, व पुरुष काम न करितां खातो. या स्त्रीपुरुषांचा संग कधीही घडत नाही; तथापि इच्यामुळे विश्व निर्माण होते. याला केवळ आडनांव पुरुष आहे, परंतु तो स्वीही नाही व नसकही नाही. तो अनंग, पंधा, निकवडा, व अतिवृद्धादूनही वृद्ध आहे; याच्या उलट हिचा थाट पाहिला असतां क्षणांक्षणामध्ये नवे नवें रूप धारण करून ही जडास सुद्धा माजविते. या पुरुषाचे पुरुषत्व अंवसेस चंद्राचे तेज लोपावं त्याप्रमाणे प्रकृतीमध्ये लोपून जाते. हा प्रकृतीमध्ये उभा असतो. ' पण जुईच्या झाडास जसा एक आधारस्तंभ द्यावा तसा तो प्ररुतीत असतो, प्ररुतिनदीच्या तीरावर असणारा हा एक मेरूच होय, याचे प्रतिबिंब पाण्यांत पडते, पण हा प्रवाहाबरोबर वाहवत नाहीं (क. १६). प्रकृतीचें नाहीं हेच रूप होय. ही निद्रितांस समीप असून जागत्या पुरुषापासून दूर राहते. केवळ सत्तासंभोगाने ही गुर्विणी होते. ही प्रसूत झाली असता ती जे सुंदर बालक प्रसवते, त्याचा ब्रह्मा हा प्रातःकाल, विष्णु हा माध्यान्ह, व सदाशिव हा सायंकाल होय. हे बाळ खेळून महाप्रळयाच्या शेजवर जे एकदां निवांत निजते, ते पुनः कल्पोदय झाल्याखेरीज जागेंचा होत नाहीं (क्र. १७). .