पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/247

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ ज्ञानेश्वरवचनामृत. [६१७२ १७२. अनन्यसाक्षात्कार. एवं तो बोले ते स्तवन । तो देखे ते दर्शन । अद्वया मज गमन | तो चाले तेचि॥ तो करी तेतुली पूजा। तो कल्पी तो जप माझा। तो निजे तेचि कपिध्वजा । समाधि माझी॥ जैसे कनकेसीं कांकणे । असिजे अनन्यपणे । तो भक्तियोगे येणे । मजसी तैसा ॥ उदकी कल्लोळ । कापुरी परिमळ। रत्नी उजाळ । अनन्य जैसा॥ किंबहुना तंतूसी पट । कां मृत्तिकेसी घट । तैसा तो येकवट । मजसी माझा ॥ इया अनन्यसिद्धा भक्ति । या आघवाचि दृश्यजातीं। मज आपणया सुमति । द्रष्टयाते जाणे॥ ज्ञा. १८. ११८०-८५. १७३. अद्वैतजागृति. तेथ अज्ञान सरोनि जाये। आणि यजिता यजन हे ठाये। आत्मसमरसी न्हाये । अवभृथीं जेव्हां ॥...॥ जैसा चेइला तो अर्जुना । म्हणे स्वप्नींची हे विचित्र सेना। मीचि जाहलो होतो ना। निद्रावशे ॥ आतां सेना ते सेना नव्हे । है मीचि एक आघवे । ऐसे एकत्वे मानवे । विश्व तया ॥ मग ता जीव हे भाष सरे! आब्रह्म परमात्मबोधे भरे। ऐसे भजती ज्ञानाध्वरें। एकत्वे येणे ॥ ज्ञा. ९.२४४-२४८. ...१ चकाकी. २ राहते. ३ ज्ञानरूपी यज्ञानें.