पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/28

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- प्रस्तावना. हरिणाच्या पोराने बळकट जाळें कुरतडावें, अगर मुंगीनें मेरु ओलांडावा तशा प्रमाणेच होणार आहे. हा मायासागर तरून जाण्यास एकच उपाय आहे, व तो म्हटला म्हणजे ईश्वराचे सर्वभावानें भजन करणे हा होय. अशा निस्मीम भक्तास हे मायाजळ अलीकडच्या तीरावरच नाहीसे होते! (क्र.33 ). १२. परंतु असा चमत्कार आहे की, हे जग देवाने आंतबाहेर व्यापिलें असूनही या जगांत देवच नाही असें देवहीन लोक म्हणतात ( क्र. 5). आकाशाने सर्वत्र व्यापावें, वायूनें क्षणभरही उगें नसावे, अग्नीने दहन करावे, पर्वतांनी आपलें ठाण सोडूं नये, समुद्रांनी आपली रेखा ओलांडून जाऊ नये, इत्यादि जे सृष्टीचे नियम आहेत त्यांचा नियंता मी असूनही हे लोक मी नाहीच - असें म्हणतात (क. ३५). या जगांतील सर्व बळ माझें असतां त्या बळाची कल्पनाही त्यांस करवत नाही. माझें बळ काढून घेतले असतां कोल्हेरीच्या वेताळाप्रमाणे ते निर्जीव पडतील याची त्यांस कल्पनाही होत नाही. (क्र. ३७). काही लोक तर माझें अस्तित्व मानूनही माझ्याकड़े चुकीच्या दृष्टीने पाहतात. कामिणीने ज्याची दृष्टि वेधली आहे तो ज्याप्रमाणे चांदण्यास पिवळे म्हणतो, त्याप्रमाणे हे माझ्या निर्मळ स्वरूपांत दोष पाहतात. मी अमानुष असतांही मला ते मानुषभाव लावितात. नक्षत्रे पाण्यात प्रतिबिंबल्याने ही रत्नेच आहेत असे समजून ती घेऊ जाणारे हंस जसे नाश पावतात, त्याप्रमाणेच नाशिवंत स्थळाकारांत मला पाहणारे लोकही नाश पावतात (क्र. ३८). मला अनाम्यास नाम, गुणातीतास गुण, अचरणास चरण, अश्रवणास श्रोत्र, अचलस नेत्र कल्पून, ते माझी प्रतिष्ठापना, आव्हान, व विसर्जन करतात. मी एकाचा कैंपक्ष घेतो, व दुसऱ्यास रागाने मारतों, असे मानुषधर्म हे मला लावितात. एकादा आकार पुढे करून हाच देव म्हणून त्याचे भजन करतात, आणि तोच बिघडल्यावर त्यास ते टाकून देतात (क. ३९). अशा प्रकारे संकुचित दृष्टीने मला न पाहतां ब्रह्मादिपिपीलिकापर्यंत मला पाहणारे, व यां जगांत जें जें भूत आहे ते ते भगवत्स्वरूपच आहे असे मानणारे जे लोक आहेत त्यांसच ज्ञानाची पहाट झाली असे समजावें (क्र. ४१). एरव्ही निरनिराळी नामें, निरनिराळी वर्तनें, निरनिराळे वेष पाहुन अतःकरणांत भेद उत्पन्न झाल्यास जन्मसहस्रं झाली तरी संसारांतून पार पडतां येणार नाहीं; एकाच तुंबिणीच्या वेलास दीर्घ, वक्र, वर्तुळ अशी जशी फळे लागतात, त्याप्रमाणे भिन्न भिन्न वस्तूंमध्ये अभेद पाहणें हेंच ज्ञानाचे लक्षण होय (क्र. ४२). शिवाय, ईश्वर व जगत्