पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/42

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. . दोघही यास सारखेच वाटतात. खांबास रात्र काय किंवा उजेड काय, निद्रिस्तास अंगाशी लगटणारी सप असो अगर उर्वशी असो, त्याप्रमा णेच अशा पुरुषास कोणी ईश्वर म्हणून पूज्य म्हणो अगर चोर म्हणून गांजो, ' हा दोघांस सारखेच लेखतो (क्र. १४७ ). ध्यानाचे वेळी अष्टसात्त्विक भाव उत्पन्न झाल्याने तो आनंदाच्या परमावधीस पोचतो; आंतबाहेर गात्रांचे बळ हारपून जातें; वर्षाऋतूंत ज्याप्रमाणे शैलाच्या अंगावर सर्वत्र कोमल अंकुर फुटावेत त्याप्रमाणे त्याच्या अंगावर स्वेदकणिका उत्पन्न होतात; आंत सांपडलेल्या अलिकुळामुळे ज्याप्रमाणे कमलकलिका आंदोळते, त्याप्रमाणे आंतल्या सुखोरीच्या बळाने हा बाहेर कांपतो; कपूर्रकर्दळीची गर्भपुटें उकलली असतां ज्याप्रमाणे आंतून थेंब पडावेत त्याप्रमाणे याच्या नेत्रांतून थेंब पडतात; आणि समुद्रास वेळोवेळी ज्याप्रमाणे भरती यावी त्याप्रमाणे हाही वेळोवेळी सुखोनि उचंबळून येतो (क. १४८). स्वरूपाच्या आलिंगनवेळी 'दोन' ही भाषा नाहीशी होऊन सुखरूपानेच केवळ हा तेथें राहतो ( क. १५० ). परंतु ही स्थिति प्राप्त होण्याचे भाग्य लक्षावधि लोकांमध्ये एखाद्यासच लाभते; असंख्य सैनिकांतून ज्यावेळी शस्त्रे शरीरांत घुसतात त्यावेळी विजयश्रियेच्या पाटावर बसणारा मनुष्य विरळाच (क्र. १५१)! औषध घेतल्याबरोबर ज्याप्रमाणे एकदम आरोग्य होत नाही, अगर सूर्य उगवल्याबरोबर ज्याप्रमाणे माध्यान्ह होत नाही, त्याप्रमाणे ही स्थितीही एकदम प्राप्त होत नाही. ओल्या जमिनीत उत्तम बीज परिलें तरी अलोट फळ येण्यास वेळच लागतो; भुकेल्यामुळे षड्रस पक्वान्ने वाढिली तरी त्याची तृप्ति ग्रासोपासींच होत जाते; त्याप्रमाणे वैराग्यलाभ झाला, सद्गुरूची भेट झाली, उत्तम मार्गही प्राप्त झाला, तरी आत्मप्ताक्षात्कार होण्यास वेळ लागतोच. एकदा आत्मसाक्षात्कार झाल्यावर त्यास साधन करण्याची फारशी जरूरी रहात नाही, असें ज्ञानेश्वरांचे मत आहे. एकदा योगतुरंग स्थिर झाला म्हणजे हा वैराग्याचे अंगत्राण किंचित् दिले करतो, व दुजा भावच नाहीसा झाल्याने ध्यानाची तलवार आवरती घेतो; महोदधीस गंगा मिळाली असतां ती जसा आपला वेग सांडते, अगर कामिनी कांतापाशी जशी स्थिर होते, तसा हा आत्मसाक्षात्कार झाल्यावर साधनहल्यार हळूच ठेवतो. तथापि पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीदिवशी ज्याप्रमाणे चंद्राचे बिंब किंचित् न्यून असते, अगर सोळाकशी सुवर्णापेक्षां पंधराकशी सुवर्ण जसें थोडेसें कमी पडते, त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये आणि बह्म होणान्यामध्ये किंचित् तरी फरक राहतोच (क्र. १५३).. THA