पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/78

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- तत्वज्ञान. धरिजे तो जनीं। दीप होये ॥ तैसी छत्तीसही इये तत्वे । मिळती जेणे एकत्वे । तेणे समूहपरत्वें । क्षेत्र म्हणिजे ॥ आणि वाहतेनि भौतिक। पापपुण्य येथ पिके । म्हणोनि आम्ही कौतुकें । क्षेत्र म्हणों ॥ ज्ञा. १३. १५१- १५६. २३ अनित्य देह, नित्य आत्मा. तरि परमात्मा म्हणिपे । तो ऐसा जाण स्वरूपे । जळी जळे न लिंपे । सूर्य जैसा ॥...॥ आरिसां मुख जैसे । बिंबलिया नांव असे। देहीं वसणे तैसे। आत्मतत्वा ॥ तया देहा म्हणती भेटी । हे सपायर्या निर्जीव गोठी। वारिया वालवें गांठी । केही आहे ॥...॥ एक निघे पूर्वेकडे । एक ते पश्चिमेकडे । तिये भेटीचेनि पाडे । संबंध हा ॥...॥ देह तंव पांचांचे जाले । हे कर्माचे गुणी गुंथले। भंवतसे चाकी सूदले। जन्ममृत्यूच्या ॥ हे काळानळाच्या कुंडीं। घातली लोणियाची उडी। माशी पांख पाखंडी। तंव हे सरे॥ है विपाये आगीत पडे । तरि भस्म होऊनि उडे । जाहाले श्वाना वरपडे। तरि ते विष्ठा ॥ या चुके दोहीं काजो। तरी होय कृमींचा पुंजा। हा परिणाम कपिध्वजा । कश्मल गा॥.... १ राबणे, २ शरीर. ३ संबंध. ४ सर्वथैव. ५ व्यर्थ. ६ बनलेले. ७ दोऱ्यांत. ८ फिरणे. ९ चढवलेले. १० गोळा. ११ हलवणे. १२ नाहीसे होते. १३ कदाचित्, १४ प्राप्त, स्वाधीन. १५ प्रकार, कार्य. १६ वाईट. 92