पान:ज्योतिर्विलास.pdf/108

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ ज्योतिर्विलास. आणि हल्ली ते १२ आठवड्यांत एक सेकंद मागे पडते. म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वी पृथ्वीला अक्षप्रदक्षिणेस जो काळ लागे त्याहून हल्ली सेकंदाचा ८४ वा भाग जास्त लागतो. हा काल अत्यंत अल्प आहे. व तो पुढे त्याहूनही कदाचित् अल्प होईल. व आपले घड्याळ लावतांना त्याबद्दल विचार आपल्यास करण्यास नको. कारण पृथ्वी, सूर्य, नक्षत्रे, ही घड्याळे हल्ली जशी आहेत त्याप्रमाणे आपल्याला घड्याळ लावावयाचें. ती घड्याळे प्राचीनकाली व भविष्यकाली कशी का असतना ! तरी पृथ्वीवरील घड्याळांचे घड्याळही मंदशीघ्र होते हे मनांत येऊन मन विस्मयभरित होते. COBAERALD