पान:ज्योतिर्विलास.pdf/181

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उल्का . सन १८७९ च्या नवंबरांत सातारा जिल्ह्यांत कालंबी गांवीं एक अशनि पडला त्याचे वर्णन विविधज्ञानविस्तार मासिक पुस्तकांत (पु. ११, पृ० २४१) पुष्कळांनी वाचले असेल. आकाश स्वच्छ असतांही अशनिपात होतो. परंतु दिवसास अशनिपात होतो तेव्हां बहुतकरून एक काळा ढग दिसून त्यांतून दगड पडतात असे दिसते. ढग दिसण न दिसणे हे काही अंशी पहाणाऱ्याच्या स्थानावरही अवलंबून आहे. नार्मडीतील अशनिपाताची हकीकत वर लिहिली आहे त्या पाताच्या वेळी एका गांवच्या लोकांस ढग किंवा धूर कांहीं न दिसतां नुसती एक अग्नीच्या गोळ्यासारखी उल्का दिसली. परंतु दुसऱ्या एका गांवीं उल्का न दिसतां ढग दिसला. उल्का पृथ्वीवर येऊन पडल्यावरचे त्यांचे जे रूप त्यास 'अशनि' अशी संज्ञा वर दिली आहे. उल्कांचे में पूर्वरूप त्यासही अशनि अशीच संज्ञा आपण देऊ. सांप्रत ही गोष्ट निर्विवाद ठरली आहे की कोट्यवधि अशनि अनेक प्रकारच्या कक्षांतून सूर्याभोवती फिरत आहेत, व त्यांनी सर्व आकाश व्यापून गेले आहे. यावरून अशनि एकमेकांस लागलेले असून त्यांची अगदी गर्दी झाली असेल असें समजावयाचे नाही. सरासरीने एक लक्ष किंवा कदाचित एक कोटि घन मैल प्रदेशांत एकादा अशनि असेल; तथापि त्यांची एकंदर संख्या अगण्य आहे यांत संशय नाही. आकाशांतल्या अशनींची शारीरघटना कशी आहे याविषयी निश्चितपणे काही ठाऊक नाही. त्यांचे स्वरूप कांही असो, पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतां तिला मागात हजारो अशनि भेटतात. पृथ्वीच्या वातावरणांत ते पेटतात. त्यांचे जे प्रज्वलित रूप त्याच उल्का होत. 7. अशनि पेटतात कां? ह्याचा आपण विचार करूं. उष्णता म्हणजे एका प्रकारची गति असें सांप्रत सिद्ध झाले आहे. थंड वारा व उष्ण वारा यात भद इतकाच की उष्ण वाऱ्याच्या अणूचे आंदोलन अधिक वेगाने होते; आणि त्याचे अण दुसऱ्या पदार्थांवर आपटले म्हणजे त्या पदार्थाच्या अणूत आंदोलन उत्पन्न करितात, आणि आपली उष्णता त्यांस देतात. यामुळे एकादा पदार्थ मोठ्या वेगाने वातावरणांतून गेला तर त्यांत उष्णता उत्पन्न झाली पाहिजे. दर सेकंदास १२५ फूट चालणाऱ्या पदार्थाच्या पुढे उष्णमापक यंत्र ठेविलें तर त्यांत एक अंश उष्णता वाढते. हे वाढण्याचे मान वेगाच्या वर्गाशी प्रमाणांत असते. दुप्पट म्हणजे २५० फूट वेग झाला तर उष्णता ४ अंश वाढते. पृथ्वी आपल्या कक्षेत दर सेकंदांत ९८००० फूट (सुमारे १८॥ मैल) चालते. आणि अशनीच्या अंगीही वेग असतो. नवंबरांतल्या वृष्टीतल्या उल्का दर सेकंदास सुमारे २६ मैल या वेगाने पृथ्वीच्या समोरून पृथ्वीकडे येत असतात. दोन्ही वे. गांची बेरीज सुमारे ४४ मैल झाली. या वेगाने वरील हिशेबाने सुमारे तीस चाळीस लक्ष अंश उष्णता उत्पन्न होते. इतकी उष्णता प्रत्यक्ष अशनीच्या अंगी येते असे