या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। डी व्हॅलेरा बुद्धि इतकी सर्वगामी आणि कुशाग्र होती, की त्याने कोणत्याही धंद्यांत कीर्ति संपादन केली असती. लहानपणापासून त्याने संगीताचा अभ्यास केला होता, आणि तो अकालींच मृत्युवश झाला नसता तर उच्च प्रतीचा संगीतज्ञ म्हणून त्याचे नांव मागे राहिले असते. आयरिश संगीताविषयी त्याला फार आवड होती, आणि कॅथराइन या आयरिश स्त्रीशी लग्न केल्यापासून तर केवळ आयरिश संगीताने तृप्त न रहातां आयरिश भाषेचाही अभ्यास करावयास त्याने प्रारंभ केला. न्यू यॉर्कमध्ये तो असतांना त्याच्या घरी येणा-या प्रत्येक इसमाचे स्वागत तो आयरिश भाषेतच करी, आणि अस्खलित आयरिश बोलणारा एखादा गृहस्थ भेटावयास आला, की त्याला परमावधीचा आनंद होत असे. कोणाशीं संभाषण करावयाचे झाले, कीं तो आयरिश भाषेतच प्रारंभ करीत असे, आणि संभाषण ऐन रंगांत आलें म्हणजे कधीं कधीं मनांतील विचार प्रगट करावयास योग्य असे आयरिश शब्द त्याला आठवेनातसे होऊन तो दुसन्या भाषेत बोलू लागे. मग सर्व मंडळी हंसू लागत आणि तोही त्या हंसण्यांत मनापासून सामील होत असे. | डी व्हॅलेराची आई कॅथरॉइन ही आयर्लंडमधील लिमेरॉक परगण्यांतील बूरी गांवच्या कोल आडनांवाच्या घराण्यांतील होती. तीही सुसंस्कृत होती, व तिच्या सौंदर्याविषयी सांगावयाचे झाले तर तिच्याइतकी सुस्वरूप स्त्री हजार पांचशांत सांपडणें दुर्मिळ असेच म्हटले पाहिजे. ती ऐन तारुण्यांत होती तेव्हां ब्ररी गांवाला ती अलंकारभूत समजली जात असे, व १८७९ च्या आक्टोबरमध्ये जेव्हां ती स्वदेश सोडून अमेरिकेला गेली तेव्हां • गांवाचे सौंदर्य नष्ट झालें!' असे ब्ररीच्या लोकांनी उद्गार काढले. प्रथमपासूनच कॅथराइनच्या अंतःकरणांत स्वदेशाभिमान जागृत होता, आणि कांहीं कारणाने तिला अमेरिकेस जावे लागले तरी आपल्या मायभूमीवषयींचे तिच्यातलनमा