या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३ बंडखोराला जन्मठेप घेऊन तो आयर्लंडच्या किनान्याकडे येत होता. परंतु दुर्दैवाने एका इंग्रजी आरमारी जहाजाने या जहाजाला पकडले. त्याबरोबर पूर्वी ठरल्याप्रमाणे जहाजाच्या कप्तानाने जहाजाला सुरुंग लावला. दारूगोळा इंग्रजांच्या हाती पडला नाहीं, पण रॉजर केसमेंट सांपडला. पुढे त्याला फांशीं देण्यांत आले, व ईस्टरच्या सणांत रविवारच्या दिवशीं डब्लिन, कॉर्क वगैरे कित्येक शहरांत एकदम बंड व्हावयाचे होते ते झालें नाहीं. इतर शहरांतील बंड तसेच जिरलें तरी डब्लिन शहरांत सोमवारी बंडाचे निशाण फडकले. बंड पुकारण्याचा हुकूम आला तेव्हां पूर्वी ठरल्याप्रमाणे डी व्हॅलेरा आपल्या जागी बरोबर हजर होता. रिंगसेंडपासून माउंट स्टूटपर्यंतच्या भागावर हल्ला चढविण्याचे काम डी व्हॅलेराकडे होते. त्या दिवशी या भागांत विशेष निकाराची लढाई झाली, कित्येक लोक कामी आले, व जखमी लोकांची संख्या तर फारच मोठी होती. या निकराच्या चकमकीतच एखाद्या मुरलेल्या सेनापतीला शोभेल असे एक काम डी व्हॅलेराने केले. चकमक चालू होती तेथून थोड्याच अंतरावर दारू गाळण्याची एक भट्टी होती. ती भट्टीची इमारत शत्रूच्या लोकांनी अडविली तर त्यांना तो एक मोठा फायदा होईल हे डी व्हॅलेराला स्पष्ट दिसत होते. पण नुसती हळ्याची सरळ मुसंडी मारून शत्रूला तेथून हुसकावून लावणे आपल्याला अशक्य आहे हेही त्याला उघड दिसत होते. शेवटी ती इमारत वापरण्याचे आपणच सोंग करावयाचे त्याने ठरविले. तसे केले म्हणजे शत्रू कदाचित् तोफांचा भडिमार त्या इमारतीवर करील व पुढे त्यांनाच आश्रयार्थ उपयोगी पडणारी इमारत त्यांच्याच भडिमाराने जमीनदोस्त होईल, असा त्याने अदमास बांधला. आणि तोच शेवटीं खरा ठरला. आपल्या योजनेप्रमाणे त्याने दिवसा आपलें निशाण त्या इमारतीवर फडकाविलें, आणि रात्री त्या इमारतींत दिवे वगैरे लागलेले शत्रूला दिसतील, व आपण त्या इमारतींत बावरत आहोत असा