या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण चवथे मस्तवाल मुत्सद्यांना शह लिंकनच्या अभेद्य तुरुंगांतून डी व्हॅलेरा निसटला ही बातमी प्रसिद्ध होतांच जिकडे तिकडे मोठी खळबळ उडाली. या बातमीने आयरिश लोक साहजिकपणेच आनंदित झाले. इंग्लंडमध्ये मात्र तिचा परिणाम फार निराळा झाला. सरकारच्या योजना पार ढांसळून पाडून सरकारच्या इभ्रतीवर डी व्हॅलेराने जबरदस्त प्रहार केला असे लोकांना वाटले. कांहीं लोकांनी तर असे उद्गार काढले की, एका आयरिश बंडखोराने ज्या सरकारच्या डोळ्यांत अशा प्रकारे त्यांच्याच घरांत असतांना धूळ फेंकली त्या सरकराचे प्रजाजन म्हणवून घेण्याची आम्हांला लाज वाटते. डी व्हॅलेराची बंधमुक्तता इतक्या अचानकपणे घडून आली होती, की त्या अद्भुत प्रसंगाकडे सा-या जगाचे लक्ष वेधणे अपरिहार्य । होते. इंग्लिश लोकांनी कितीही दांत ओंठ खाल्ले व मुठी वळल्या तरी त्याचा कांहीं परिणाम होणे शक्य नव्हते. परराष्ट्रांतील वृत्तपत्रकार डी लेराच्या हालचालींत आतां अधिक लक्ष घालू लागले. डी व्हॅलेराविषयींची बारीकसारीक माहिती देखील विद्यत्संदेशांच्या द्वारें सा-या देशांत पसरू लागली. पॅरिसमध्ये त्या वेळी चाललेल्या तहपरिषदेस हजर असलेल्या अँडै निओलिस नांवाच्या एका प्रमुख वृत्तपत्रकाराला तर डी व्हॅलेराच्या हकीकतीविषयी इतके कुतूहल उत्पन्न झाले, की तहपरिषदेची बातमी घेण्याचे काम दूर सारून सीन टी. ओकेली या आयरिश गृहस्थांची त्याने मुद्दाम मुलाखत घेतली, व ** डी व्हॅलेरा तुरुंगांतून निसटला तरी कसा ? असा त्यांस मोठ्या आतुरतेने प्रश्न विचारला. ओकेली यांनी त्या प्रश्नास असे उत्तर दिले, की “ मला इतकेच सांगणे शक्य आहे, की या सुटकेसाठी किती तरी दिवस खटपटी कराव्या लागल्या. कारण ज्या लिंकनच्या तुरुंगांत डी व्हॅलेर