पान:तरंग अंतरंग.pdf/१०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बहिणीकडे जात असू. लाईनशीर येऊन भाचे कंपनी नानांना वाकून नमस्कार करत आणि बदल्यात कोटाच्या खिशातली एक-एक लिम्लेटची गोळी मिळवत असत. पांजरपोळातील घरामागच्या मैदानात काठ्याच्या स्टंपा करून क्रिकेट खेळायला माझे शाळकरी मित्र येत. दोनच दिवसांपूर्वी सध्या बंगळूरस्थित असणारे, कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्टचे निवृत्त डिव्हिजनल इंजिनिअर रणसिंग बन्ने (वय ८०) यानेही कोल्हापूरच्या दिवसांची आठवण काढली आणि काही क्षण आम्ही मनोमन 'त्या' ग्राऊंडवर मस्त घालवले. म्हणूनच सत्तर वर्षे मनात बंगली बांधून राहणाऱ्या कोल्हापूरच्या असंख्य आठवणी माझ्यासाठी 'रामरक्षे' प्रमाणे सदैव गळ्यातील ताईत होऊन गुण्यागोविंदाने नांदतात ...... आणि मी कायमचा कोल्हापूरचा ऋणी राहणे पसंत करतो. १०५ / तरंग अंतरंग