पान:तरंग अंतरंग.pdf/१२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुभाषच्या दिशेने पोहू लागलो. त्याला ओरडून, "घाबरू नको, सावकाश हात मार. आपण जेट्टीला नाही लागलो तरी पुढे लागू " असा धीर देत राहून त्याला गाठले. हसून, 'आता काळजी नाही, म्हणून त्याच्या बरोबरीने पोहू लागलो आणि बघता बघता किनारा जवळ आला. आमच्या पी.ओ. ने अगोदरच किनारा गाठला होता. त्यानंही जोरात सूर मारून आम्हाला गाठलं आणि तिघे 'जेट्टी'वर चढलो. सर्वांनी टाळ्या, शिट्या वाजवून आनंद व्यक्त केला. जावयानं आमच्या वरनं पैसे ओवाळून गरीब पोरांना दिले. मी सुभाषला मिठी मारली. काही वेगळं घडलं असतं तर... ? मी त्याच्या आई- वडिलांना, भावा-बहिणींना कसे तोंड दाखवणार होतो, या विचारानंच थरकाप उडाला. पुढे पूर आला की, मी आणि सुभाष 'कुंडलिके'ची नारळ वाहून पूजा करत असू. दोन्ही हात जोडून कृतज्ञता व्यक्त करत असू. आज सुभ्या नाही... माझा लाडका मित्र सुभाष आपल्या नव्या वधूबरोबर नव्या संसाराची चित्रे रंगवत पहिल्यांदाच वाराणसीला आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना रेल्वेतच डी -हायड्रेशनने गेला. कुठलाही पूर पाहिला की, सुभ्या माझ्या डोळ्यांपुढे उभा राहतो आणि नकळत माझ्या डोळ्यांनाही पूर येतो.... १२३ / तरंग अंतरंग