या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

< つ तर्कशाख्. असें प्रथम दिसतें. परंतु हा कांहीं निषेधरूप सवैगत झणजे इ सिद्धांत नव्हें: आपण प्रत्येक हिंदूविषयीं, तो ब्राम्हण नव्हें असें कांहीं ह्मणत नाहीं, किंवा ‘ कीणताही हिंदू ब्राह्मण नाहीं ? असेंही ह्मणत नाहीं. तर * कांहीं हिंदू ब्राह्मण नाहींत ? हाच व एवढाच कायतो आपल्या बोलण्याचा भाव आहे. मूळ वाक्याचें असें रूपांतर केल्यावरही, यांतील विधेयापेक्षां उद्देश्याचाच संख्यागम मोठा असण्याचा विशेष संभव आहे असें प्रथम वाटेल. परंतु मनामध्यें आपण कोणत्या दोन वस्तूंचीं परस्पर तुलना • करती हैं पाहिलें तर तें वाक्य 'कांहीं हिंदू अब्राह्मण आहेत। असेंच आहे असें आपणास दिसेल. ह्मणजे 'सवें अब्राह्मण मनुष्यांचा' एक वर्ग केल्यानें हिंदूच्यापेक्षां अब्राह्मणांचाउद्देश्याच्यापेक्षां विधेयाचा-संख्यागम मेोठा असेंच झालें. १६. असा एक प्रश्न उद्भवतो कीं, ज्या वाक्यांतील विधेयप्रदू जातिवाचक असून व्यतिविशिष्ट असतें, अशी वाक्यं कोणत्या सदराखालीं घालावयाचीं ? जसें. ' सवे मनुष्यें सर्व विचारशनिमान प्राणी आहेत.? आपण जेव्हां नुसर्त ‘सर्वे मनुष्यें विचारशक्तिमान आहेत' असें ह्मणत, तेव्हां आपला भाव असा असतो कीं, प्रत्येक मनुष्य ह्मणजे मनुष्य वर्गातील प्रत्येक व्यक्ति * विचारशक्तिमान प्राणी ? या वर्गीत येते. परंतु प्रत्येक विचारशक्तिमान ग्राणी मनुष्यवर्गीत येतो असेंही जर आपणांस आढळलें असेल तर ' सर्वे मनुष्यें सर्व विचारशक्तिमान प्राणी ऑहंत' असेंही आपणास ह्मणतां येईल. परंतु या वाक्याचा खरा अर्थ काय होतो ? आपणास , असें दिसतें