या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. اللغة 'पहा). कारण या प्रत्येक सिद्धांतांत, एका प्रजातींतील सवे अपरजाती सांगाव्या लागतात. उदाहरणार्थ, ‘सिद्धांत' ही एक प्रजाति आहे, व ‘ भावा'च्या संबंधानें पाहिलें असतां 'प्रत्येक सिद्धांत विधिरूप किंवा निषेधरूप असती' असें आपणांस आढळतें. ह्मणजे या ठिकाणीं एकंदर दीन विधानें झालीं तीं अशीं- प्रत्येक सिद्धांत विधिरूप असतेी' व 'प्रत्येक सिद्धांत निषेधरूप असतो ? व हीं दोन्हीं एकत्र करून आपण असें ह्मणती कीं, 'प्रत्येक सिद्धांत विधिरूप किंवा निषेधरूप असतो. ' हीं विधानें एकाच वेळीं दोन्ही खरी असू शकणार नाहींत, परंतु दोहोंपैकी फत कोणतें तरी एक खरें असलेंच पाहिजे. याला अट एवढीच कीं, परजातीचे आपण केलेले विभाग बरोबर असले पाहिजेत. याचप्रमाणें आपणांस तीन विधानेंही एकत्र कारतां येतील, जर्से ' प्रत्येक वस्तुज्ञान, व्यक्तिवाचक गुणवाचक किंवा जातिवाचक असतें. ? तसेंच चार विधानें एकत्र करतां येतील, जर्से ' प्रत्येक सिद्धांत ओ, इ, ए किंवा ओ असला पाहिजे ? यांत उ सिद्धांत मिळवून आपणांस पांच विधानांचेंही एक वाक्य करतां पेद्देल, जर्से 'प्रत्येक सिद्धांत अ, इ, ए, ओ किंवा उ असला पाहिजे. ? अव्यवहित अनुमान, २३. कोणत्याही एका दिलेल्या सिद्धांतापासून दुसरे कांहीं सिद्धांत तर्कशास्त्रांत सांगितलेल्या पद्धतीनें शोधून काढतां येतात, या सिद्धांतांनां 'अव्यहित अनुमानें । असें ह्मणतात. कारण पुढील भागांत ज्या अनुमानांविषयी <