या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* о З तकैशास्त्र.. कीं तीं करितांनां वस्तूंचा परस्परसंबंध आपणांस ताबडतीव्र दिसत नाहीं, तर तो तिसङ्ख्या एका वस्तूच्या मध्यू स्थान आपल्या ध्यानात यण्याजागा असता. उदाहरणाथ, गोपाळा जानवें घालतो किं नाहीं हें मला कळावयास पाहिजे आहे, व यासंबंधानें मला ताबडतोब विधान कांहींच करतां येत नाही, कारण याच्या पेोशाखावरून याची जात वगैरे कांहींच कळत नाहीं. इतक्यांत एकजण मला असें सांगतो कीं हा ब्राह्मण आहे. हें कळल्यावर “ ब्राह्मण ' हें मध्यपद धरून, व ' सर्व ब्राह्मण जानवें घालतात ? हा जा सिद्धांत मला पूर्वीच माहीत आहे त्यावरून, मी असें अनुमान कारतों कीं, * गोपाळा ब्राह्मण असल्यामुळे, जानवें घालतो.' या ठिकाणीं असें आढळतें कीं, आपणाजवळ एकंदर तीन पर्दे आहेत, ज्यांची परस्पर तुलना करणे आहे अशीं “ गेोपाळा ' व 'जानवें घालणारा ' हीं दोन पर्दे, व ज्या पदाच्या साहाय्यानें आपण ही तुलना करितों असें 'ब्राह्मण' हैं एक पद. अनुमान क्रियेचें पृथक्करण केल्यास तींत एकंदर तीन तुलना केलेल्या असतात असें आपणास आढळेल; मुख्य पदांपैकीं एक पद व मध्यपद यांची एक तुलना, मुख्य पदांपैकीं दुसरें पद व मध्यपद यांची एक तुलना, व मध्यपदाशी पृथकू पृथक् ज्यांची तुलना केली आहे अशा दोन्हीं पदांची एक परस्पर तुलना. या तिन्हीं तुलना मिळून अनुमानक्रिया होते. व इचें लक्षण कांहीं विवू क्षितू मुमेयांच्या आधारावर एक नवें विधान करणें, असें स॥ागतल आहे.