या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. ३८. गुणागम दर्शविणारें अनुमान. आतांपर्यंत अनुमानाविषयीं जें विवेचन केलें आहे तें करतांनां, सिद्धांताच्या फक्त संख्यागमाविषयींच आपण विचार करीत आलों, व चवदाव्या कलमांतील तत्व, जें फक्त संख्यागमालाच लागू पडतें, तेंच येथपर्यंतच्या सर्व अनुमानांचें नियामक तत्व आहे असें मानिलें. परंतु पूर्वी हें सांगितलेंच आहे कीं, सर्व सिद्धांतांचा, त्यांच्या गुणागमापासून उसन्न होणारा, एक अर्थ वेगळाच असतो. असें आहे तर, गुणागम दर्शविणारें अनुमान होऊं शुकेल की नाहीं, असा सहजुच प्रश्न उद्भुवती. या प्रश्नाचें पूर्णपणें उत्तर देण्यापूर्वी, हैं कबूल केर्ले पाहिजे कीं, बहुतेक सिद्धांतांमध्यें प्रथम कल्पना जी आपल्या मनांत येते ती गुणागमाविषयींच असते, संख्यागमाविषयीं असत नाही. ' बाळ खेळतें ' असें जेव्ह आपण ह्मणते तेव्हां तें खेळण्याच्या क्रियेंत गुंतलें आहे एवढेंच सांगण्याच। आपला उद्देश असतो, * खेळणा-या वस्तूं? च्या वर्गीपैकी तें एक आहे असें सांगण्याचा नसतो. परंतु ज्यांपासून आपणांस निगमन काढतां येईल, अशा प्रकारें संबद्ध असलेल्या विधानांविषयीं जेव्हां आपण विचार करतो, तेव्हां मात्र निराळा प्रकार असतो. अशा वेळीं प्रथम आपेोआप जी कल्पना आपल्या मनुांत येते ती संख्याग्माविषयींच असते. जेव्हां आपण असें अउ’ मान करतों कीं ' भिल्लांनां बोलण्याची शक्ति असते ह्मणून ते मनुष्यच आहेत, ? तेव्हां आपण मनांत सर्व भिलांना ' बोलण्याची शक्ति असणारे प्राणी ? या वर्गीत ढकलतो. प्रत्येक पदांत कोणता तरी गुण आहे हें तर खरेंच, परंतु