या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १५३ हीं वसंतऋतु आहे. ', हलीं ग्रीष्म, वर्षी, शरद, हेर्मत, व शिशिर यौपैकीं कोणताही ऋतु नाही. संविभागी प्रतिज्ञेतील विभाग निःशेष नसल्यामुळे, संविभागी अनुमानांत पुष्कळ वेळां एक हेत्वाभास होत असती, त्याला स्याद्वाद असें ह्मणतात, जर्से, कांहीं लोक असें प्रतिपादन करितात कीं, ‘ आपणांस सर्व ज्ञान अनुभवानें मिळालें असावें, किंवा जन्मतःच मिळालें असावें. ' नंतर त्यांना असें आढळतें कीं, * जन्मतः आपणांस कोणतेंच ज्ञान नसतें, ” कारण नवीन उपजलेल्या मुलास कांहींच कळत नसतें; यावरून ते असें निगमन काढितात कीं, ' आपणांस सर्व ज्ञान अनुभवानेंच मिळतें.' परंतु तिसरी अशी एक कल्पना आहे, व हीच जास्त सयुक्तिक दिसते, कीं, * कहीं नियम अथवा तत्र्वे जन्मतःच आापल्या मनांमध्यें ठसलेली असतात, व तीं अनुभवानें परिपक होतात. ” याच प्रकारचीं आणखी कांहीं उदाहरणें तर्कसिद्ध विभागाविषयीं विवेचन करितांना मार्गे आम्ही दिलींच आहेत (भाग १ कलम ४७ पहा) अशा प्रकारचे हैत्वाभास शोधून काढणें हा तर्कशास्त्राचा विषय नव्हे. असे हेत्वाभास कोणत्या ठिकाणीं (ह्मणजे कोणत्या कारणानें ) होऊ शकतील एवढेंच तर्कशास्त्राच्या योगानें आपणांस समजर्त.