या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8くく तर्कशास्त्र. भास होण्यास, मुद्दाम दुस-यास फसविण्याचे हेतूनेच तो केला पाहिजे अशी कांहीं जरूर नाहीं, जो मनुष्य त्याचा उपयोग करितो तो स्वतःच कदाचित त्यानें फसलंला असतो; किंवा साधारणतः तो प्रथम स्वतःच स्वार्थबुद्धीच्या किंवा रागाच्या भरांत फसलेला असतो, व नंत्र इच्छेप्रमाणें - विचाराला वळण मिळून, ज्या प्रमाणार्ने तो स्वतः फसलेलु। असती, तैच प्रमाण तो आपल्या पक्षाच्या समर्थनार्थ पुढें करितो. लबाड लोकांनीं समजून उमजून आपणांस फसविण्याकरितां केलेल्यू हे.त्वाभासासंबंधानेंच फक्त आपण सावध राहावें असें नाहीं, तर जे लोक, ते स्वत: बोलतात तें खरें आहे असें मानतात, त्या लोकांनीं आपणांशीं बोलतांना केलेल्या हे.त्वाभासासंबंधानेंही सावध राहिलें पाहिजे; व स्वार्थबुद्धीचा किंवा दुस-या कोणत्याही दुष्ट विकाराचा आपल्या मनांवर पगडा बसल्यामुळे आपल्याकडून न कळत जे हेत्वाभास घडतात ते फारच घातक असल्या कारणानें त्याविषयीं तर विशेषच खबरदारी ठेविली पाहिजे. ७१. उगीच अतिशयोक्ति केली आहे असें वाचकांस वाटू नये एवढ्याकरितां, हेत्वाभासाच्या योगानें आपण फसून जाऊं नये अशाबद्दल तर्कशास्त्र काय करूं शकेल, व काय करूं शकणार नाही, हें एकदां आह्मीं स्पष्ट सांगून ठेवितों. कोणत्याही गोष्टींत चूक न होऊं देण्याचा उत्तम उपाय ह्मटला ह्मणजे, खरी गोष्ट काय आहे हें शोधून काढण्याची अंतःकरणापासून इच्छा धरणें हा होय. कारण अशी इच्छा बाळगल्यानें, कोणीही आपणांस अमुक एक