या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. 窓の8 ७८. संविभागी अनुमानांतील हेत्वाभास मुख्यत्वेंकरून संविभागी प्रतिज्ञेतील विभाग निःशेष नसल्यामुळे उत्पन्न होतात, व या हेत्वाभासांस स्याद्वाद असें म्हणतात. ( भाग ३, कलम ४६ पाहा). परंतु हे शोधून काढण्यास त्या अनुमानोत्तींतील पदार्थीकडे आपणांस पाहावें लागतें; व म्हणून ‘ अनुमितिप्रतिबंधक ” या सदराखालीं हे हेत्वाभास येतात. ७९. अनुमितिप्रतिबंधक हेत्वाभास.-विचारपद्धतीच्या नियमांचें उल्लंघन ज्यांत झालें होतें, तेवढेच हेत्वाभास * अनुमितिकरणप्रतिबंधक ” या सदराखालीं आले; परंतु यापुढें ज्या हेत्वाभासांचा विचार आपणांस करणें । आहे, ते शोधून काढावयास त्यांतील वस्तूंकडेच पाहाणें आपणांस अवश्य आहे. ८०. १. संदिग्ध किंवा द्वयर्थ पर्दे-विशेषेकरून द्वयर्थी मध्यपद-( भाग ३, कलम ९ पाहा ). या हेत्वाभासांत एखादे पद प्रतिज्ञेत व निगमनांत निरनिराळ्या अथीनें योजिलेलें असतें, किंवा मध्यपदाचे जागीं एकच शब्द असून तो दोन्हीं प्रतिज्ञांत निरनिराळया अर्थानें योजिलेला असतो. अनुमितिकरणप्रतिबंधक हेत्वाभासाशीं अत्यंत निकट साम्य असणारा, अनुमितिप्रतिबंधक हेतृभासांपैकी हेत्वाभास, हूच होय. कारण, खरें पाहलें असतां, तिहीपेक्षां अधिक पर्दे असणाया हेवाभासांच्या सदराखालीं हा हेत्वाभास येतो. ( कलम ७६ पाहा ).