या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. ༢༢ वसिष्ठाश्रमीं लवानें धरून आणिलेल्या श्यामकर्ण वारूपासून व ' कादंबरींतील ? *मेघनादः' अश्वापासून तों तहत शामभटाच्या तट्टणीपर्यंत, कल्पनासृष्टीतील व या जड मृष्टींतील, सर्व अश्धांचा समावेश व्हावा. २१. प्याप्रमाणें एका अर्थी जातिज्ञानाचा विषय अपरेिमित आहे; कारण यामध्यें, विवक्षित * विशिष्ट चिन्ह ? ज्यांत आहे अशा अपरिमित पदार्थीचा समावेश होतो; या पदार्थीची संख्या बरोबर कधींच सांगतां येणार नाही; व दुस-या अर्थी हा विषय परिमित आहे, कारण त्यांतील पदार्थाची संख्या * विशिष्ट चिन्हाच्या ? योगानें परिमित झाली आहे. कधीं कधीं, ‘ विशिष्ट चिन्ह ? कोणतें आहे हें आपणास कळलें आहे असें जरी वाटत असतें, तरी त्याची आपणास फत पुसट पुसटच कल्पना आलेली असते. उदाहरणार्थ ' घेोडा म्हणजे काय आहे ? हैं फक्त त्याच्या आकाराच्या अर्धवट कल्पनेनेंच काय तें बहुतेक लोक जाणतात. ' सुंदर ? या नांवाचा आपण एक वर्ग बनबितों, परंतु त्या विशेषणास योग्य अशा पदार्थातील, समानधर्म कोणचे आहेत हें ठरविणें । अतिशय कठिण आहे. आपल्या मनांत जै कांहीं सुखकर विकार उत्पन्न करतें तें ‘ सुंदर ' अशी आपणास त्याची सरासरी व्याख्या करितां येईल, परंतु ती सवेत्र उपयोगी पड़णार नहीं. पहिल्या प्रथम बृहुतेक वर्ग केवळ व्यावहारिक सोईच्या अनुरोधानेंच बनलेले असतात, व शास्त्रांत लागणारी सूक्ष्मता व निर्दोषता त्यांत दृष्टीस पडत नाही. मनुष्यांची शास्त्रांत जशी जशी प्रगति होत जाते, तसे