या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. 5 .३३ रांनीं जातिज्ञानाचा संख्यागम हें नांव दिलें आहे, व दुस-या - भागाला गुणागम हें दिलें आहे. 'विचारशक्तिमान् प्राणी' या जातिज्ञानांत विचारशक्ति धारण करणार सर्वे प्राणी येतात. ह्मणून त्यास संख्यागम आहे असें ह्मणतात; व या सर्व प्राण्यांत 'विचारशक्ति' हा गुण आहे ह्मणून त्यास गुणागम आहे असें ह्मणतात. यावरून हेंही ध्यानांत येईल कीं, जातिज्ञानाचा संख्यागम मुख्यत्वेंकरून वर्गीकरणाच्या योगानें आपणास कळतो, व गुणागम मुख्यत्वेंकरून निष्कर्षांच्या योगानें ह्मणजे 'विशिष्ट चिन्ह ? ठरविल्याच्या योगानें कळतो. हें स्पष्ट आहे कीं कांहीं जातिज्ञानांचा संख्यागम दुस-यापेक्षां मोठा असतो. जसें, * शिद्दी' यापेक्षां 'मनुष्य' या जातीचा संख्यागम मोठा आहे, ह्मणजे त्यांत अधिक प्राण्यांचा समावेश होतो. तसेंच कांहीं जातिज्ञानांचा गुणागम दुस-यापेक्षां मोठा आहे. जसें, ' मनुष्य ? यापेक्षां । शिद्दी ' या जातीचा गुणागम मोठा आहे, कारण मनुष्यांत सांपडणारे सर्वसाधारण गुण असून, शिवाय आफ्रिकेंतील रहिवाशांचे जे विशेष गुण तेही ' शिद्दी ? या जातिज्ञानांत आढळतात. यावरून हैं उघड झालें कीं, जातीचा जसजसा संख्यागम अधिक म्हणजे त्या जातिवाचक शब्दानें दर्शविलेल्या पदार्थीची संख्या जसजशी अधिक, तसतसा त्याचा गुणगम किंमा म्हणज तसतसे त्या पदार्थीतील स