या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

된 상 तर्कशास्त्र. मानगुण कमी. आणि याच्याच उलट, जातीचा गुणागम जसजसा मोठा म्हणजे त्यांतील व्यक्तींच्या समानगुणांची संख्या जसजशी अधिक, तसतसा त्याचा संख्या गम कमी म्हणजे तसतशी ते सर्व समानगुण असणा-या पदार्थौची संख्या कमी, उच्च व नीच वर्गीकरण. २६. एका जातींतील पदार्थ साधारणपणें, एकाच नव्हे तर अनेक गुणांच्या योगानें, एकत्र झालेले असतात. कधीं कधीं या गुणांची संख्या तर अपरिमितच असते. अशा ठिकाणीं आपणास एकाहून एक उच्च अशीं वर्गीकरणें करितां येतील. उदाहरणार्थ, ' कुत्रा ” हा वर्ग घ्या. या वर्गात पुष्कळ गुणांचा समावेश होत आहे व ते गुण इतके आहेत कीं, त्या सर्वोचीं नांवें सांगणें केवळ अशक्य आहे. आतां आपणांस यापैकी कोणता तरी एक गुण मनांत धरितां येईल व तो गुण ज्यांत आहे अशा सर्व प्राण्यांचा एक वर्ग करितां येईल. उदाहरणार्थ, ' मांस खाणें' हा एक गुण धरूं व त्यापासून ' मांसभक्षक ' असा एक वर्ग करूं आतां । मांसभक्षक ? प्राण्यांमध्येंच पाठीचा कणा असणें ? हा एक गुण धरूं व त्यापासून ' पाठीचा कणा असणारे प्राणी' असा एक वर्ग क्रूं, तसेच पुन्हां या प्राण्यांमधील * इंद्रियें असणें' हैं। एक गुण धरूं व त्यापासून १ सेंद्रिय प्राणी " असा