या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला, ६१ काय ? ' तर ' आपले विचार स्पष्ट करून दाखविण्याचें साधन, '-जणूं काय, कालेजांत किंवा शाळांत शिकविले जाणारे दुसरे विषयच नाहीत, व जणूं काय विचार स्पष्ट करून दाखविण्याचीं दुसरीं साधनेंच नाहीत. तर्कशास्त्राचें ज्यानें अध्ययन केलें आहे त्यास, लक्षण सांगणें झाल्यास एखादा असाधारण धर्म ठरविलाच पाहिजे, हें समजतें, व असा धर्म तो शोधूं लागतो, व तो सांपडल्याखेरीज त्याचें समाधान होत नाहीं. ५८. आतां ज्याला आपण द्रव्यात्मक जातिज्ञान असें नांव दिलें आहे, त्याचें लक्षण कसें सांगावयाचें, हें ध्यानांत ठेवण्याजोर्गे आहे. हें आपणांस माहीत आहे कीं, अशा जातीचे सर्व समानगुण आपणांस सांगतां येणार नाहींत. कारण ते काय काय आहेत ते कळणेंच महा दुर्घट आहे. अशा ठिकाणीं, जो एकदा विशेष गुण इतर सर्व गुण दर्शवील, तोच सांगितला ह्मणजे पुरे आहे. उदाहरणार्थ ' सस्तन प्राणि ” ( ह्मणजे ज्या प्राण्यांचे मादीस स्तन असतात असे ) या जातींत आढळणारे सर्व गुण आपणांस सांगतां येणार नाहींत. तरी, * ते आपल्या पोरांस पाजणारे प्राणी आहेत ? असें ह्मटलें असतां तें योग्य लक्षण होईल. कारण हा गुण सर्व जातींत समान आहे, व इतर सर्व गुणांचा दर्शकही आहे. ९९ - दुसरा नियम,-लक्षणु अव्याप्त किंवा अतिव्याप्त असतां कामां नये. [ लक्ष्यैकदेशे लक्षणस्यावर्तनमव्यातिः । अलक्ष्ये लक्षणगमनमतिव्यातिः] व्याकरणाचें, * शुद्ध कसें बेलार्वे हैं ज्यायोर्ग समजर्त तें शास्त्र' असें ल