पान:तीन तत्वज्ञानी.pdf/33

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३)
साक्रेटिसाचा तुरुंगवास.

 साक्रेटिसाला मरणाची शिक्षा झाली ती कांहीं आगंतुक कारणांनी नाही. त्याचा तुरुंगवास मात्र आगंतुकच होता. त्याची शिक्षा ही मानवी स्वभावांत असलेल्या दोन परस्परविरोधी तत्वांचा परिणाम होय. या दोन तत्वांच्या झगड्यांत मनुष्यमात्राची प्रगति घडून आलेली आहे. साकेटीस व त्याचे प्रतिपक्षी यांच्या तंटयाचे मूळ या तत्त्वांत आहे. साक्रेटीस हा नव्याचा अभिमानी होता, तर त्याचे प्रतिपक्षी हे जुन्याचे अभिमानी होते; तो सुधारणावादी होता, तर ते रूढिवादी होते; साक्रेटिसाला डोळस अशी धर्मभक्ति पाहिजे होती, तर त्यांना अंधधर्मश्रद्धा हवी होती; साक्रेटिसाची पारमार्थिक दृष्टि होती, पर त्यांची सांसारिक दृष्टि होती तो खऱ्याचा भोक्ता होता, तर ते आभासावर भिस्त ठेवणारे होते; त्याला अस्सल पाहिजे होते, त (त्यांचे नकलेवर समाधान होत होते; तो दूरदृष्टि होता, तर ते संकुचितदृष्टि होते; तो स्वार्थपराङ्मुख होता, तर ते स्वार्थपरायण होते. याप्रमाणे परस्परविरोधी तत्त्वांच्या वालींचा झगडा अपरिहार्यच होता, व या झगड्यांत साक्रेटिसाच्या प्रतिपक्षीयांचा क्षणैक विजयहि झाला खरा. परंतु आपल्या अन्यायी कृत्याबद्दल पुढे अथीनियन लोकांना इतका पश्चात्ताप झाला की, ज्या पुरुषाला त्यांनी गुन्हेगार म्हणून विष प्राशन करावयास लावले त्यालाच त्यांनी पुरुषश्रेष्ठाचा मान दिला व त्याच्या पश्चात् त्याचे विलक्षण गौरव केलें, साक्रेटिसाचा तुरुंगवास ही मात्र एक आकस्मिक गोष्ट होती व त्याचे कारणहि क्षुल्लकच होते व केव्हां केव्हां क्षुल्लक गोष्टीपासून फार मोठे परिणाम झालेले आपण पाहतो त्या कोटीपैकी हा तुरुंगवास होता. अथीनियन लोकांचे-नव्हे

२३