पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/210

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कैंचा पटु तंतुविण ॥ ३ ॥ निळा ह्मणे आम्हांवीण । नाहीं चि देवपण तुह्मांसी ॥ ४ ॥ ॥ ६५० ॥ आधीं भक्त पाठी देव । प्रगटे भाव देखोनी ॥ १ ॥ काचोळी पाठी कण । भुस निकण मग दाणा ॥ २ ॥ आधी तंतु पाठी वस्त्र । कनका अळंकार रूप करी ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्ताविण । कैंचें देवपण देवासीं ॥ ४ ॥ ॥ ६५१ ॥ आदि मग हे अनादि वोली । निशीनें प्रगटिली मूर्य- महिमा ॥ १ ॥ अर्थ याचा आणा चित्ता । मग विचारित कळेल ।। २ ॥ कडु चि नसतां कैंचें गोड । उप्मेविण सुरवाड़ छायेचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे पुत्रविण । न शोभे बापण वायाणे ॥ ४ ॥ | ॥ ६५२ ॥ देव अंगें निभास । भक्त रूपस चांगला ॥ ५ ॥ म्हणो- नियां ते आणिती रूपा । दर्पण पहा पां जेवि नभ ॥ २ ।। नामें रूपें मंडित केला । शृंगारला अळंकारें ।। ३ ॥ निळा ह्मणे भक्त जनक । देव बाळक या हेतु ॥ ४ ॥ |}} ६५३ ॥ भक्त करिती तैसा होय । ठेविला ठाय तया स्थळीं ॥ १ ॥ पाचारिती भाविती जेथें । अगटे तेथे रूप धरी ॥ २!; जे जे उपचार करती भक्त । ते ते स्वीकारत वाळापरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे भक्तापासीं । नाहीं यासी दुराग्रह ॥ ४ ॥ ।। ६५४ ॥ भक्तांचिये मनी जैसे । करी हा तैमें वर्तन ॥ १ ॥ नेदि होऊ आज्ञाभंग । चोदवी सवांग सेवेसीं ।। २ ।। स्तंभ पाचारितां हाके । होउनी ठाके नरहरी ।। ३ ।। निळा ह्मणे उभा द्वारीं । केला विटेवरी मग ठाके ॥ ४ ॥ ॥ ६५५ । ठायींचा हा ऋणानुबंध | प्रीतिवाद उभयतां ॥ ५ ॥ ह्मणोनि एक एकाधीन । जाणती उण खुण येरयेरां ॥ २॥ देव जाणे अंतरींचें । केलें भक्ताचे प्रतिपादी ॥ ३ ॥ निळा ह्मणे भिन्न भाव । नाहीं देव- भक्तांचा ॥ ४ ॥ ॥ ६५६ ॥ देवा भक्तां भिन्नपण । देखती जन मूर्ख ते ॥ १ ॥ सविता 22 •