पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/241

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २०० ) तें तें हरिरूपें ओळखें ॥ ३ ॥ निळा ह्मणे नित्य केला । पूर्ण पोधे उदो याला ॥ ४ ॥ ॥ ८४३ ॥ आपणा सारिखे । देखे नाढले पारिखे ।। १ ।। गुरु कृपा तो लाधला । व्यापुनी चराचर एकला ॥ २ ॥ निंदा स्पर्धा द्वेषाद्वेष । तुटले कामक्रोध पाश ।। ३ ॥ निळा ह्मणे पात्र सुखा । झाला एकाएकी देखो ॥ ४॥ ॥ ८४४ ।। मानामान संकल्प आशा । तुटला मोहजाळ फांसा ॥ १ ॥ तया गुरुचिया भक्ता । नुरे चि कोठे गोंवा गुंता ।। २ ।। सर्वोतरी आपुलें रूप । देखती नेणतां विकल्प ॥ ३ ॥ निळा ह्मणे कर्मातीत । झाले होउनी कर्मी रत ।। ४ ।। ॥ ८४६ ।। सुखाची च ओतली । मूर्ति याची उसावली ॥१॥ अविच्छिन्न भगवद्भुद्धी । सर्व भूतीं निरावधी ॥ २ ॥ मोह ममता कैंची आतां । आशा कल्पना हरिच्या भक्तां ॥ ३ ॥ निळा ह्मणे सनकादिकां । अनुभव तैसा याचा निका ॥ ४ ॥ | ॥ ८४६ ॥ विठ्ठल नामें वाहे टाळी । ब्रह्मानंदाच्या कल्लोळीं ॥ १ ॥ निजात्मसुखाचा सोहळा । विठ्ठल आला किती डोळां ।। २॥ सकळ हि सुकृते ओळलीं । विठ्ठलरूपें उभी टेलीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे जडली बुद्धी । निस हरिनामें समाधी ॥ ४ ॥ ॥ ८४७ ॥ श्रीहरिच्या संकीर्तनें । तुटली बंधने वहुतांचीं ॥ १ ॥ होउनियां उपरती । राजा परिक्षिती उद्धरला ॥ २ ॥ कीर्तनें नारद मुक्त शुक । आणि सनकादिक प्रल्हाद ।। ३ ॥ निळा म्हणे हरिची कथा । एकात्मता देवभक्तां ॥ ४ ॥ | ॥ ८४८ ॥ जडोनियां ठेली । वृत्ति पा लिगदली ॥ १ ॥ मुखी नामाची गर्जना । हरिचा आठव क्षणक्षणा ।। २ ।। रूपाचे चिंतन । तेथे चि गुंतलें मन ॥ ३ ॥ निळा म्हणे दिलें । देह पायीं समपलें ॥ ४ ॥ | ॥ ८४१ ॥ तेथे चि बैसलें । मन नुठी कांहीं केलें ॥ १ ॥ ईटेवरी विराजती । चरण ते चि आठवती ॥ २ ॥ कट कर तुळसीमाळा । ध्यानीं वैसला तो डोळा ॥ ३ ॥ निळा म्हणे भूकतान । गेली विसरो- नियां मन ॥ ४ ॥