पान:तुकारामाचे निवडक अभंग.pdf/42

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२

ओढी । वचन आवडी संतांचिये ॥ २ ॥ अंतरीं या राहे
वचनाचा विश्वास । न लगे उपदेश तुका म्हणे ॥ ३ ॥

  ८५. काय काशी करिती गंगा । भीतर चांगा नाहीं
तो ॥ १ ॥ अधणी कुचर बाहेर तैसा । नये रसा
पाकासी ॥ २ ॥ काय टिळे करिती माळा । भाव खळा
नाहीं त्या ॥ ३ ॥ तुका म्हणे प्रेमेंविण | बोले भुंके अवघा
शीण ॥ ४ ॥

  ८६. नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥ १ ॥
तैसी चित्तशुद्ध नाहीं । तेथे बोध करील काई ॥ २ ॥
वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥ ३ ॥
प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥ ४ ॥ तुका ह्मणे
जीवनेविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥ ५ ॥

  ८७. वचनेंचि व्हावे आपण उदार । होइल विश्वांभर
संतुष्टचि ॥ १ ॥ सत्यसंकल्पाची फळे बीजाऐशीं । शुद्ध
नाहीं नासी पावों येत ॥ २ ॥ वंचिलिया काय येतसे
उपेगा । शरीर हे नरकाचेंचि आळे ॥ ३ ॥ तुका ह्मणे
जीव जितां थारे लावा । पडलिया गोवा देशधडी ॥ ४ ॥

  ८८. मीच विखळ मीच विखळ । येर सकळ बहु
बरें ॥ १ ॥ पाहिजे हे क्षमा केलें । येणे बोलें विनवणी
॥ २ ॥ मीच माझे मीच माझे । झाले ओझें अन्याय ॥ ३ ॥
आधीं आंचवला आधीं आंचवला । तुका झाला
निमनुष्य ॥ ४ ॥

_____

__________________________________________

१ पापी.