पान:तुतीपासून रेशीम.pdf/१५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४८ काढीत जाऊन नंतर हात बसल्यावर दोन दोन तारा काढीत जाव्यात, तर असें करणें एकपक्षीं चांगलें खरें. पण यांत एकच एक तार आपल्या दुसऱ्या भागाशी घांसत जाण्याची सोय केलेली नसल्यानें, निघणाऱ्या रेशमाची तार एकजीव झालेली नसते, व तें रेशीम अवांतर रेशमापेक्षां हलकें सम- जलें जातें, व त्याने त्याची किंमत कमी आल्याने विनाकारण बरेंच नुकसान होतें. ह्मणून असला ठोकळा देखील कांहीं अंश निरुपयोगीच आहे. जपानी तऱ्हेचा तारठोकळा मात्र सगळ्यांत चांगला. यांत एक तारडोळा असतो. व निघणाऱ्या एकाच तारेस तीच तार घासली जाऊन एकजीव करण्याची यांत सोय केलेली असते. या तारडोळ्याचे साहाय्यानें कोणीही दहा दिवसांचे सवर्याने रोज दहा ते बारा तोळे अव्वल प्रतचिं रेशीम काढू शकतो. अतिशय सरावलेला इसम रोज वीस ते बावीस तोळे देखील असल्या तारठोकळ्यावर रेशीम काढू शकतो. एखाद्या इसमाचा रेशीम उकलण्यावर जर चांगला हात बसलेला असेल, तर तो एकाच भट्टीवर निर- निराळे दोन तीन तारठोकळे ठेवून तितक्या तारा सहज काढूं शकेल. ह्मणजे जितक्या तारा काढण्याची एखाद्याची शक्ति असेल, त्या मानानें भट्टीचे कढईपाशीं तितके अधिक तारठोकळे ठेवून तो रेशीम उकलीत राहील. जपानी तऱ्हेचे तारठोकळे टाटा सिल्क फार्मचे म्यानेजर यांस बंगलोर येथें लिहिल्यास ते पाठवूं शकतील. तसेंच बंगाली तऱ्हेचे तार-