पान:तुतीपासून रेशीम.pdf/१८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७९ असतो, तसला पाला किड्यांनीं खाल्यास त्यापासून नुक- सान होते किंवा नाहीं. वर वर पहातां नुकसान होते, असें वाटतें खरें. पण तसें नसतें. असला पाला किड्यांनी खाल्यास किड्यांस अपाय होतो, खरा. पण केव्हां ? ज्या वेळेस किड्यांची जोपासना कमी रसदार पाल्यावर चालली असेल, व मध्येच त्यांना नेहमीपेक्षां अधिक रसदार पाला खावयास घातला असेल, त्या वेळेस मात्र असला पाला किड्यांना अपायकारक होतो खरा. पण सुरुवातीपासून असल्या रसदार पाल्यावर त्यांची जोपासना करीत गेल्यास असल्या पाल्यापासून किड्यांस अपाय होण्याची भीति नसते. पहि- ल्यानें किड्यांस रसदार पाला घालून नंतर कमी रसाचा पाला त्यांस घालीत गेल्यास नुकसानीचे ऐवजी फाय- दाच होतो. बागाईत पिकाप्रमाणें पाणी दिलेल्या लागवडीं- तील पाला, बिनपाण्याच्या लागवडीच्या पाल्यावर किड्यांची जोपासना चालू असतां, जर खावयास घातला, तर तो त्यांस बाधतो. पण जर सुरुवातीपासून अखेरपर्यंत बागाईत पाल्यावर किड्यांची जोपासना करीत गेलें तर त्यापासून त्यांस कांहीं एक अपाय होत नाहीं. तद्वतच पावसाळ्यांत पाला जरी अधिक रसदार असला, तरी त्यापासून नुकसान नसतें. जेथें सारखा पाऊस पडत असतो, तेथें अवांतर गैर- सोईंबरोबर सोईही अनेक आहेत. हमेशा लागवडीवर पाऊस पडत असल्यानें पाल्यावर धूळ वगैरे सांठण्याचा व तद्द्वारें किड्यांस अपाय होण्याचा अगदीं संभव नसतो.