पान:तुतीपासून रेशीम.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ पहावें. दहा वीस किडे खालच्या पाल्यांत आहेत, असे आढ- ळल्यास ते वेंचून ज्या सुपलींत पहिल्याने किडे काढले अस- तलि, तींत टाकावे. व ते दहा वीस किडे कांत टाकीत अस- ल्यामुळे जर जाळीवर आले नसतील, तर सर्व किडे पांच सहा तासाचे आंत कांत टाकण्यास सुरुवात करणार आहेत, असें समजून त्यांस त्या वेळेस खाण्यास पाला घालून पुढें पाला घालावयाचें काम चौवीस तास बंद ठेवावें. जर अर्धे अधिक किडे पाल्याखाली राहिलेले आढळतील, तर त्या सुपलीतील सर्व किडे कांतीला गेले आहेत, असें समजून ती सुपली पाला न घालतां निराळे चौखुरावर ठेवावी. व त्या सुपलींतील किड्यां- स ज्या वेळेस पाला घातला असेल, त्या वेळेपासून चौबीस घंटे पावेतों पाला घालूं नये. त्यांपैकीं जाळीवर आलेल्या किड्यांस एकवेळ पाला घालून ते किडे थोड्याच वेळांत कांतीला जाणार आहेत, असें समजून त्यांनाही त्या वेळेपासून पाला घाल- ण्याचे काम चौवीस घंटे बंद करावें. किडे कांत टाकीत असतां त्यांस पाला घालूं नये. कारण त्या वेळीं त्यांनी पाला खाल्यास बिलोरी रोग होतो. ह्मणून त्या वेळीं किड्यांस पाला घालूं नये. पाला बंद करणें तो सर्व किडे कांत काढावयास लागल्या- वर बंद करावा. व सर्व किड्यांनीं कांत काढल्याशिवाय पाला घालावयाचें काम फिरून सुरू करूं नये. ज्या सुपलीतील किड्यांनी अगोदर कांत टाकावयास सुरवात केली असेल, ती सुपली चौखुरावर तळास ठेवावी; व ज्या सुपलींतील किडे मागाहून कांत टाकणार असतील, ती