पान:तुतीपासून रेशीम.pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९३ पाडून फुलपांखरू होऊन बाहेर पडतो. माळेंत चिंचोळीं टोकें बाजूस असल्यानें फुलपाखरूं चिंचोळ्या भागास भोंक पाडून बाहेर पडतें. आजूबाजूस भोंक पाडलेला कोसला अगदीं निरुपयोगी होतो. त्यापासून जाड तारेचेंही रेशीम निवण्यास त्रास पडतो. चिंचोळ्या भागास भोंक पडलेल्या कोसल्याचें रेशीम कापसाच्या तारेसारखें वळून काढतां येतें. माळ करून टांगून ठेवलेल्या कोसल्यांतून किड्यांस बाहेर निघावयास विशेष श्रम पडत नाहींत. तसेंच, ते जो मलिन रस आपल्या गुदद्वारांतून पिचकारीसारखा टाकीत असतात, त्यांत ते लुडबुडत नाहींत. माळ तयार केली, ह्मणजे ती टांगुन ठेवावी. व तिचें जमिनीकडील टोंक जमिनीपासून निदान दीड फुटावर तरी असले पाहिजे. नाहीं तर जातां येतां उंदीर समाधिस्थ असलेल्या किड्यांस खाऊन टाकतील. तसेंच त्या माळेवर मुंग्या जाऊ नयेत, अशीही व्यवस्था केलेली असावी. फुलपाखरें होऊन कोस- ल्यांतून बाहेर पडल्याबरोवर पंधरा वीस मिनिटांचे आंत नर मादी फुलपाखरांचा संयोग होतो. ह्मणजे, तीं संयोग होण्याच्या लायकीचीं होतात. यांत नर फुलपाखरूं लहान असतें व मादी मोठी असते. नर फुलपाखरूं सारखें फड - फडत असतें व मादी शांत असते. मानवी सहवासाने यांची उडण्याची शक्ति कमी झालेली असते. नरमादी किड्यांचा संयोग झाला, झणजे सायंकाळचे चार वाजे पावेतों तसेंच युग्म ठेवून तें युग्म सुटलें नसल्यास दोन्ही फुलपाखरें निराळीं