पान:दानशूर महाराजा सयाजीराव.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सयाजीराव महाराज हे जगप्रवासी होते. त्यांनी जगातील अनेक देशांचा प्रवास केला होता. या प्रवासात अनेक गरजवंत लोक महाराजांना भेटत असत. त्यांची निकड पाहून महाराज त्यांना मदत करत. प्रवासात महाराजांनी केलेली मदत ही देशातील लोकांना होतीच, त्याचबरोबर परदेशातील लोकांनाही केली होती. विद्वान, प्रतिभावान आणि प्रज्ञावंत राजा म्हणून सयाजीराव महाराजांकडे पाहिले जात असे. त्यांचा वाचन व्यासंग, ज्ञानोपासना यामुळे अनेक वेळा त्यांच्याकडे जगभरातून मार्गदर्शनपर मदत मागितली जात असे. महाराजांचा अनुभव आणि प्रवास यामुळे ते सर्वांना मार्गदर्शन करत. यामध्ये नातेवाईक, अधिकारी, संस्थानचे प्रमुख, इंग्रज अधिकारी आणि सामान्य लोक यांचा समावेश होता. महाराज भाषण करताना प्रजेला सुधारणा करण्यासाठीसुद्धा मार्गदर्शन करत. योग्य मार्गदर्शन करणे हेही एक प्रकारचे दातृत्वच आहे.
 सयाजीराव महाराजांनी स्वतःपासून ते राज्याच्या प्रशासनात खूप काटकसर केली. राज्याचे उत्पन्न वाढावे, राज्याचा तिजोरीतील धनाचा गैरवापर होऊ नये म्हणून त्यांनी काळजी घेतली. अनावश्यक खर्चाला आळा घातला. या सर्वांचा परिणाम म्हणून बडोदा राज्य जगातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत राज्य बनले. वाढलेल्या आणि बचत झालेल्या धनाचा वापर लोककल्याणासाठी करण्याचे त्यांनी ठरवले. राज्याचे वाढलेले उत्पन्न प्रजेच्या सुधारणा करण्यासाठी वापरले. त्यामधून त्यांनी

दानशूर महाराजा सयाजीराव / २४