या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुट्टीतच बिपिनची भेट व्हायची. तो हॉटेलात वेटर म्हणून काम करू लागला. पगाराबरोबर टीप्सचे पैसे त्याच्या खिशात खुळखुळू लागले. तेव्हा तो मला श्रीमंत झाला असं वाटायचं. तो पर्ल, टुरिस्ट अशा मोठमोठ्या हॉटेलात काम करायचा. तिथल्या पब, बिअर बार, परमीट रूममध्ये दारू द्यायचं काम करणारा बिपिन; पण त्यानं कधी दारूला शिवलं नाही. नाही म्हणायला सिगारेटची चव तो चाखू लागला होता. छानछोकी कपडे, सिगारेटचे झुरके, टाय, बूट घालणारा बिपीन आम्हाला देवानंदपेक्षा कमी रोमँटिक नव्हता.
 बिपीन आश्रमात ज्या लक्ष्मीबाईंच्या खोलीत राहायचा तिथंच नलिनी जोशी या आमच्या बालमंदिराच्या बाई, शिक्षिका राहात. त्यांना आम्ही ननीताई म्हणत असू. त्यांचं लग्न होऊन त्या आफ्रिकेत गेल्या होत्या; पण काही वर्षांतच त्यांचे पती अचानक वारले. दोन लहान मुलांसह त्या भारतात सासरी परतल्या. त्यांचा संसार गुजरातमध्ये मढीला होता. शेती, घर, जमीन-जुमला, मोठी इस्टेट होती. ते दीर सांभाळत. ननीताई परत मुलांसह अचानक आली व वाटा मागू लागली, तसं सासरच्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. ननीताईनं बिपिनला बोलावून घेतलं अन् बिपिनच्या आयुष्यानं एक वेगळंच वळण घेतलं. तो तिथं जाऊन ताईची शेती सांभाळू लागला. हॉटेलच्या नोकरीमुळे बिपिनला हिंदी, गुजराती, इंग्रजी कामचलाऊ येत होतं. त्याचा त्याला तिथं फायदा झाला. ताईला बिपिनमुळे इस्टेटीचा वाटा नावावर करून मिळाला. दरम्यान, बिपीनचं आश्रमातल्या मुलीवरचं प्रेम यशस्वी झालं. त्याच प्रेयसी बालवाडीच्या कोर्सला डहाणू, कोसबाडला शिकत होती. बिपिन गुजरातहून जवळच असल्यानं भेटत राहायचा; पण पुढे ननीताईंची मुलं मोठी झाली अन् बिपिनने कोल्हापूरला येण्याचा निर्णय घेतला तेव्हा कैलास त्याच्या पदरी होता. अवघ्या वर्षाच्या कैलासला घेऊन मीरासह एक दिवस परतला.

 आता बिपिन पूर्वीचा राहिलेला नव्हता. मुलं पदरात असल्यानं असेल कदाचित किंवा गुजरातमधील अनुभवाने असेल; पण आपलं आयुष्य वा-यावरची वरात असता कामा नये; असं त्याला वाटू लागलं. हसणं, खिदळणं जाऊन गंभीर झालेला बिपिन खराच वाटत नसायचा. पूर्ण कायाकल्प झालेला बिपिन! तब्येत खालावलेली, गप्प गप्प राहणारा, विठ्ठलच्या १० बाय १० च्या खोलीत त्याचा संसार होता. विठ्ठल व बिपिन लहानपणापासून लक्ष्मीबाईंकडे राहात आल्यानं दोघांत भावाचं नातं होतं. विठ्ठलनी लक्ष्मीबाईंना

दुःखहरण/११८