हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकूला खोपी मिळाली. इतर कुटुंबासह त्याचे जीवन सुरू झालं. त्यांची घरं रेल्वेलाईनीजवळच होती. हाकेच्या अंतरावर रेल्वे स्टेशन होतं. वस्तीवरची पोरं रोज स्टेशनात दुपारच्या वेळी वर्दळ कमी झाली की खेळायला जायची. आई-वडील शेताची कामं सांभाळत पोरांकडे लक्ष देऊन असायची.
 एकू, रामशा व जकी तिघं मिळून वकिलांची शेती सांभाळत. वर्षही गेलं नसेल. जकी नि रामशामुळे एकू दारूच्या आहारी गेला. अन् वर्षातच त्यानं स्वर्ग गाठला. जमीरावर आकाश कोसळलं खरं; पण गावाकडं घेतलेलं कर्ज, आगाऊ मजुरीपोटी तिची इच्छा नसताना पोरींसाठी राहणं भाग पडलं. एकूनं जग सोडलं, तसं तिची जिद्द वाढली. दोन मर्दीची कामं एकटी करायची. वाकून-वाकून तिला कुबड येऊन गेलं.
 एक दिवस जमीरा कामात गुंग होती. पोरी डोळा चुकवून केव्हा स्टेशनवर खेळायला गेल्या ते समजलंच नाही. दुपारी एकला जेवणाची सुट्टी करून खोपीत आली तर खोपी रिकामी, स्टेशनवर गेली तर पोरींचा पत्ता नाही. सारं गाव पालथी घातली; पण पत्ता नाही.
 इकडे या मुली खेळत-खेळत खोळंबलेल्या रिकाम्या रेल्वे डब्यात खेळत बसल्या होत्या. अन् अचानक रेल्वे गाडीनं गती घेतली. स्टेशनं घेतली तशी माणसं डब्यात वाढत गेली अन् पोरी चेंगरू लागल्या. विरारचर्चगेट शटलच्या दोन चार फेन्या केल्या तरी पोरी भेदरून डब्यातच. योगायोगानं सकाळी ड्यूटीवर गेलेल्या एका पोलिसाची नजर या मुलींकडे पडली. त्याच्या सारा प्रकार लक्षात आला अन् त्यानं चर्चगेट येताच पोरींना पोलिसांच्या हवाली केलं नि तो आपल्या ड्यूटीवर गेला. पोरींची रवानगी चिल्ड्रन्स एडस सोसायटीच्या मानखुर्द येथील रिमांड होममध्ये करण्यात आली.

 या संस्थेचे स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. इथं अशी चुकलेली, घर सोडून पळून आलेली, रस्त्यावर भटकणारी, गुन्हे करताना सापडलेली, हरवलेली शिवाय अनाथ, निराधार, काही मुकी, मतिमंद, वेडसर अशी ३000 च्या घरात मुलं-मुली आहेत. ती साध्या भारतातून आलेली असतात. मुंबई पोलिसांचे एक पथक आहे. जापू पथक, (ज्युव्हेनाइल एड पोलीस युनिट) बालसहाय्यक पोलीस पथक, ते मुंबईभर फिरत असतं. शिवाय मुंबईची सर्व उपनगरं, तेथील पोलिस स्टेशन्स, रेल्वे पोलिस, सर्वांशी ते संपर्कात असतं. रोज अशी पाच-पन्नास मुलांची वर्दी त्यांच्यापर्यंत येते. ते अशा मुलांना गोळा करतात व चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या ताब्यात

दुःखहरण/२४