या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना

 हादरवून टाकणाच्या जगाचे अंतर्भेदी दर्शन
 कोणीतरी रडतंय
 मघापासून
 कोणीतरी रडत होतं
 रात्रभर कोणतरी रडत बसलंय
 युगानुयुगे

     - अरुण कोल्हाटकर


 ‘खाली जमीन वर आकाश' या बहुचर्चित आत्मकथनामुळे सुनीलकुमार लवटे हे नाव मराठी वाचकांना मोठ्या प्रमाणात परिचित झालेले आहे. याबरोबरच त्यांची महाराष्ट्रीय समाजाला वेगळी ओळख आहे. कोल्हापूरच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी सक्रिय काम केलेले आहे. हिंदीचे प्राध्यापक व प्राचार्य म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. विशेषतः बालसंकुल कल्याण संस्थेत तसेच निराधारांच्या कामासाठी त्यांनी महाराष्ट्र पातळीवर काम केलेले आहे. याशिवाय वि. स. खांडेकर यांचे बरेचसे अप्रकाशित साहित्य प्रसिद्धीस आणले आहे. कामाची सततची अखंड ऊर्जा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव आहे. विधायक अशा समाजबांधणीला ते नेहमी आपल्या कामातून महत्त्व देत आलेले आहेत. पंधराएक दिवसापूर्वी त्यांनी फोनवरून विचारणा केली, “माझे दुःखहरण हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यासाठी तुला प्रस्तावना लिहायची आहे." मी आकस्मिक गडबडलो व काहीसा अवघडलोही; परंतु ते ज्या