या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दूध व दुभते. प्रकरण १ लें. - - - शेतकरी आणि दुभती जनावरें. शेतकरी आणि प्राणी यांचा परस्पर संबंध. शेतांमध्ये काम करून आपले स्वतःचे आणि आपल्या देशबांधवांचे अन्न व वस्त्रप्रावरण यांकरितां निरनिराळ्या प्रकारची पिके काढणे हे शेतकन्यांचे मुख्य काम आहे. परंतु शेताची नीट मेहनत करणे व निरनिराळ्या प्रकारची खतें घालून हरत-हेची धान्ये, फळे वगैरे उत्पन्न करणे, ही कामें शेतकरी, जमीन, बीजें व खते यांचे योगानेच फक्त होत नाहीत. तर त्यांस दुसन्या प्राण्यांचीही मदत घ्यावी लागते. शेतकऱ्यांचा आणि प्राण्यांचा जितका संबंध येतो तितका दुसरे कोणाचाही येत नाही. बैल-रेड्यासारखे प्राणी जमानीची चांगली मेहनत करण्यास उपयोगी पडतात, गाई-मशी-बैल-रेडे पुरवून दुधासारखें पौष्टिक अन्न देतात, आणि मधमाशा-फुलपाखरांसारखे प्राणी तर त्यांचे शेतांतील व बागांतील फळांचे उत्पत्तीला कारणीभूत होतात. इतकेच नव्हे, तर जमीनीत असलेल्या अति सूक्ष्मजंतूंवरच त्यांचे पिकांची सर्व मदार अवलंबन असते. उलटपक्षी रानडुकरें व कोल्ह्यांसारखे प्राणी त्यांचे पिकांची नासाडी करतात व टोळप्रभृतीसारखे कीटक त्यांचे शेतांत एक हिरवें पानही राहू देत नाहीत. ह्यांवरून शेतकन्यांचा आणि प्राण्यांचा किती निकट संबंध आहे हे लक्षात येईल. तेव्हां जे प्राणी त्यांस मदत करितात त्यांची नीट जतणक करणे व पैदास राखणे हेही त्याचे कर्तव्यकर्म आहे. ज्याप्रमाणे त्याने आपल्या जमिनीची व पिकाची काळजी घेतली पाहिजे, त्याप्रमाणे त्याने आपल्या जनावरांचीही नीट व्यवस्था ठेविली पाहिजे. कारण त्यांचेच जिवावर त्याचा सर्व धंदा अवलंबून आहे आणि म्हणूनच जनावरांची जतणूक व पैदास हे एक शेतकीचे मुख्यांगापैकीच एक अंग आहे.